आता आठवतायेत ते फक्त काळेभोर डोळे………….


आपल्या येण्याची जाणीव आम्हाला प्रतिक्रियांद्वारे करून द्या. आपली प्रतिक्रिया इथे जरूर नोंदवा.

अपडेट्स मिळवण्यासाठी हा URL वरील URL bar मध्ये paste करा – http://feedburner.google.com/fb/a/mailverify?uri=wordpress/fQXr

*******************************

आता आठवतायेत ते फक्त काळेभोर डोळे

बाकी सर्व आकार, ऊकार, होकार, नकार
मागे पडत चाललेल्या स्टेशनांसारखे
मागे मागे जात जात पुसत चालले आहेत
पुसत जावेत ढगांचे आकार
आणि उरावं एकसंध आभाळ
तसाच भुतकाळ
त्याच्या छातीवर
गवताची हिरवीगार कुरणं
भरुन आलेली गाफील गाणी
काळे सावळे ढग
आणि पश्चिमेच्या वक्षाकडे रोखलेले
बाणाकॄतीतील बगळे

आता आठवतायेत ते फक्त काळेभोर डोळे

बंध रेशमी तुज्यासवे जे जे जुळले
अन् क्षितीजावर रंग नवे अवतरले
घनदाट ताच एकाच क्षणात हे रंगबंध विस्कटले
तुटले…………

विसरत चाललोय
नावेतून उतरताना आधारासाठी धरलेले हात
विसरत चाललोय होडीची मनोगते
सरोवरचे बहाणे,
वा नावेला नेमका धक्का देणारी ती अज्ञात लाट
ती लाट तर तेव्हाच पुसली
मनातल्या ईच्छेसारखी
सरोवर मात्र अजुनही तिथेच
पण त्याच्याही पाण्याची वाफ
किमान चारदा तरी अभाळाला भिडून आलेली
आता तर लाटा नव्हे
पाणी सुद्धा नवं आहे कदाचीत
पण तरिही
जुन्याच नावाने सरोवराला ओळखतायेत सगळे

आता आठवतायेत ते फक्त काळेभोर डोळे

क्षण दरवळत्या भेटींचे
आणि हातातील हातांचे
ते खरेच होते सारे
म्रुगजळ हे भासाचें
सुटलेच हात, आता मनात हे प्रश्न फक्त अवघडले
तुटले…………

तुझ्याकडे माझी एक सही नसलेली कवीता
मीही हट्टी
माझ्याकडे तुझ्या बोटाचें ठसे असलेली एक काचेची पट्टी
चाचपडत बसलेले काही संकेत,
काही बोभाटे अजुनही
थोडेसे शब्द, बरचसं मौन अजुनही
बाकी अनोळखी होऊन गेलो आहोत
तुझा स्पर्श झालेला मी
माझा स्पर्श झालेली तू
आणि आपले स्पर्श झालेले हे सगळे

आता आठवतायेत ते फक्त काळेभोर डोळे

मज वाटायाचे तेव्हा
हे क्षितीजच आहे हाती
नव्हताच दिशाचां दोष
अंतरेच फसवी होती
फसवेच ध्यास, फसवे प्रयास, आकाश कुणा सापडले
तुटले…………

उत्तरे चुकू शकतात
गणित चुकत नाही
पाऊले थकू शकतात
अतंरे थकत नाहीत
वाळूवरची अक्षरं
पुसट होत जातात
डोळ्याचें रगं फिकट होत जातात
तिव्रतेचे उग्र गंध विरळ होत जातात
शेपटीच्या टोकावरचे हट्ट सरळ होत जातात
विसरण्याचा छदं जडलाय आताशा मला
या कवीतांना
शहरभर पसरलेल्या संकेतस्थळांना
विसरत चालले आहेत
पत्ता न ठेवता निघुन गेलेल्या वाटा
विसरत चालले आहेत
तळ्यावर वसलेले पश्चिम रंगी आभाळ
अन् विसरत चालले आहेत
आभाळही गोदांयला विसरणारे
हिरवेगद्द तळे

आता आठवतायेत ते फक्त काळेभोर डोळे

मी स्मरणाच्यां वाटानी
वेड्यागत अजुन फिरतो
सुकलेली वेचीत सुमने
भिजणारे डोळे पुसतो
सरताच स्वप्न,
अणताच सत्य
हे असवात ओघळले
तुटले…………

आता आठवतायेत ते फक्त काळेभोर डोळे

– संदिप खरे

Image courtesy: Darshan Ambre

5 thoughts on “आता आठवतायेत ते फक्त काळेभोर डोळे………….

  1. अप्रतिम कविता , मनाला (हृदयाला ) खोलवर स्पर्श करून जाते . खरोखरच विचार करायला लावते आपले जुने प्रेम ते जुने दिवस . अप्रतिम !

  2. kharach khup sundar kavita aahe sagale diwas aathavan karun dete te premache diwas ani ti sundar sobot ji kadhihi dur hou naye ashi vatnari pan tarihi dur honari

आपल्या येण्याची जाणीव आम्हाला प्रतिक्रियांद्वारे करून द्या. आपली प्रतिक्रिया इथे जरूर नोंदवा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.