पुन्हा सोमवार ! आला देवा


जगावे म्हणता ! जरा बैजवार
पुन्हा सोमवार ! आला देवा

बॉक्सात ईमेली ! ईमेलीत बॉस
ईझी वेटलॉस ! बैठ्याजागी

आता रातंदिस ! पीपीटी चा खेळ
डोळ्यामाजी तेल ! घाला लेको

पावलोपावली ! मेंदूला ये फीट
एक्सेलची शीट ! उतू जाता

कधी एजीएम ! कधी कॉन्फरन्स
किती टॉलरन्स ! दाखवावा

आता ६ दिस ! गोठला बा काळ
१४४ ! लागू झाले

एक रविवार ! काढिला लोळू
त्याचे किती ऋण ! फेडायाचे

– वैभव जोशी

Image courtesy: BG Limaye

 

 

 

2 thoughts on “पुन्हा सोमवार ! आला देवा

आपल्या येण्याची जाणीव आम्हाला प्रतिक्रियांद्वारे करून द्या. आपली प्रतिक्रिया इथे जरूर नोंदवा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.