ह्या कशा उबदार ओळी…


ह्या कशा उबदार ओळी , शब्द हे कसले पुन्हा
हाय! सच्च्या कल्पनेला चांदणे डसले पुन्हा

“मोगरा,जाई,जुई,चाफ्याविना कविता कशी?”
उमललेले चेहरे झटक्यात आक्रसले पुन्हा

हुडहुडी भरली मनाला , आसवेही तापली
काय माझे विकतचे दुखणेच ठसठसले पुन्हा?

कागदांवर मावली नाहीच का नियमावली?
कायदे धाब्यावरी जाऊनही बसले पुन्हा !

एक कडवे प्रेयसीला, एक आईला दिले
“काय आम्ही वारलो का?” देव खेकसले पुन्हा

ही गज़ल लिहिताच आला सर्रर्रकन काटा जुना
मी पुन्हा फसताच सारे लोकही फसले पुन्हा

“आयला ! असला कवी नाहीच झालेला !” म्हणे
आज केले माफ ! पण बोलू नका असले पुन्हा

– वैभव जोशी

आपल्या येण्याची जाणीव आम्हाला प्रतिक्रियांद्वारे करून द्या. आपली प्रतिक्रिया इथे जरूर नोंदवा.

अपडेट्स मिळवण्यासाठी हा URL वरील URL bar मध्ये paste करा – http://feedburner.google.com/fb/a/mailverify?uri=wordpress/fQXr

4 thoughts on “ह्या कशा उबदार ओळी…

  1. “आयला ! असला कवी नाहीच झालेला !” म्हणे
    आज केले माफ ! पण बोलू नका असले पुन्हा………….खूप मस्त वाटली हि रचना…

  2. वैभव जोशी यांच्या सा-याच कविता खुप छान आहे

    – अमित अंजर्लेकर

  3. एक कडवे प्रेयसीला, एक आईला दिले
    “काय आम्ही वारलो का?” देव खेकसले पुन्हा…………………sundar Kavita

आपल्या येण्याची जाणीव आम्हाला प्रतिक्रियांद्वारे करून द्या. आपली प्रतिक्रिया इथे जरूर नोंदवा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.