झाली मध्यान्ह: रात्र मंदावल्या या ज्योती


झाली मध्यान्ह: रात्र मंदावल्या या ज्योती
लाभे किती दिसांनी एकांत आज या समयी
मदहोश अश्या या वेळी नीज का तुला रे आली
जावे मिठीत तुझ्या वितळून आज या प्रहरी,

भासातले हे सत्य मी जाणिते तरी ही
अंधारले भविष्य स्विकारले जरी मी
मन हे प्रेमवेडे कसे आवरू परी मी
नसशील उद्या तू जवळी कसे सावरू मला मी,

रुसलास असा न कळे का अपराध काय रे झाला
सोडून पाखरांना का बंधमुक्त तू झाला
बंधन कर्तव्याचे आखून दिले तू मजला
बळ ही सामर्थ्याचे देऊन जा चिमण्यांना,

नको अडकवू जीवा सांभाळीन मी सारे
स्वप्ने अधुरी सारी साकारीन छकुल्यां द्वारे
कवेत माझ्या आता शांत झोप तू घे रे
पाहशील वाट स्वर्गी वचन आज तू दे रे.

– अंजली राणे वाडे : वसई

2 thoughts on “झाली मध्यान्ह: रात्र मंदावल्या या ज्योती

आपल्या येण्याची जाणीव आम्हाला प्रतिक्रियांद्वारे करून द्या. आपली प्रतिक्रिया इथे जरूर नोंदवा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.