बालगीत – दिवसभर पावसात असून ,


दिवसभर पावसात असून, सांग ना आई

झाडाला खोकला कसा होत नाही ?

दिवसभर पावसात खेळून, सांग ना आई Continue reading

Advertisements

आला पाऊस


आला पाऊस मातीच्या वासांत ग
मोती गुंफ़ित मोकळ्या केसांत ग ॥ धॄ ॥

आभाळात आले, काळे काळे ढग
धारा कोसळल्या, निवे तगमग
धुंद दरवळ, धरणीच्या श्वासात ग ॥ १ ॥

कोसळल्या कश्या, सरीवर सरी
थेंब थेंब करी नाच पाण्यावरी
लाल ओहळ वाहती जोसांत ग ॥ २ ॥

लिबोळ्यांची रास कडूनिंबाखाली
वारा दंगा करी, जुइ शहारली,
चाफा झुरतो, फुलांच्या भासात ग ॥ ३ ॥

[slider title=”अधिक माहिती”]

अधिक माहिती

गायक/गायिका: पुष्पा पागधरे

संगीतकार:श्रीनिवास खळे

गीतकार:शांता शेळके
[/slider]

झाडांवरी मुके, पाखरांचे थवे
वीज लालनिळी, कशी नाचे लवे
तेजाळते उभ्या अवकाशांत ग ॥ ४ ॥

वीज कडाडतां, भय दाटे उरीं
एकलि मी इथे, सखा राहे दुरी
मन व्याकूळ, सजणाच्या ध्यासांत ग ॥ ५ ॥

– शांता शेळके

सोबतीला चंद्र देते, अंतरीचा ध्यास देतेसोबतीला चंद्र देते, अंतरीचा ध्यास देते
तू जिथे जाशील तेथे मी तुला विश्वास देते

चांदण्यांच्या पावलांनी मी तुझ्या स्वप्नात आले
या निळ्या बेहोष रात्री मी तुझ्याशी एक झाले
मीलनाला साक्ष होते ते तुला मी श्वास देते

संचिताचे सूर माझ्या एकदा छेडून घे तू
घाल ती वेडी मिठी अन्‌ एकदा वेढून घे तू
जन्मती हे सूर जेथे ते तुला आभास देते

तू कुठेही जा, सुखी हो, चंद्र माझा साथ आहे
गीत माझे घेउनी जा, प्राण माझा त्यात आहे
तृप्तिला हेवा जिचा ती लोचनांची प्यास देते

गीत – मंगेश पाडगावकर
संगीत – श्रीनिवास खळे
स्वर – लता मंगेशकर

जाहल्या काही चुका अन्‌ सूर काही राहिले


जाहल्या काही चुका अन्‌ सूर काही राहिले
तू दिलेले गीत माझे आवडीने गायिले

चांदण्यांच्या मोहराने रात्र केव्हा दाटली
काजळी काळ्या ढगांनी हाक केव्हा घातली
मी स्वरांच्या लोचनांनी विश्व सारे पाहिले Continue reading

प्रेम हे वंचिता


प्रेम हे वंचिता । मोह ना मज जीवनाचा !
द्या कुणि आणूनी । द्या मला प्याला विषाचा !

प्रीतिचा फसवा पसारा,
भरली इथे नुसती भुते,
कोणि नाही जगि कुणाचा !

गीत – प्रल्हाद केशव अत्रे
संगीत – श्रीनिवास खळे
स्वर –
नाटक – पाणिग्रहण (१९४६)

प्रिती सुरी, दुधारी !


प्रिती सुरी, दुधारी !

निशिदिनि सलते जिव्हारी !

सुखवी जिवास भारी !
मधुर सुखाच्या यातना,
व्याकुळ करिती सतत मनाला !
अमृताहुनी विषारी !

गीत – प्रल्हाद केशव अत्रे
संगीत – श्रीनिवास खळे
स्वर – बकुळ पंडित
नाटक – पाणिग्रहण (१९४६)

उगवला चंद्र पुनवेचा !


उगवला चंद्र पुनवेचा !
मम हृदयी दरिया ! उसळला प्रीतिचा !

दाहि दिशा कशा खुलल्या,
वनिवनी कुमुदिनी फुलल्या,
नववधु अधिर मनी जाहल्या !
प्रणयरस हा चहुकडे ! वितळला स्वर्गिचा ?

गीत – प्रल्हाद केशव अत्रे
संगीत – श्रीनिवास खळे
स्वर – बकुळ पंडित
नाटक – पाणिग्रहण (१९४६)
राग – मालकंस (नादवेध)