तू ही


वैभव जोशी

वैभव जोशी

किती काळ झुरशील? हरशील तू ही !
विसरतात सारे, विसरशील तू ही ॥

लवंडेल जेव्हां कुपी आसवांची
सुगंधाप्रमाणे पसरशील तू ही ॥ Continue reading

Advertisements

नश्वर


मज आयुष्याचा माझ्या कळलेला आशय नाही
जगतो हा तर्कच आहे , आलेला प्रत्यय नाही

आभास कुणा परक्याचा प्रतिबिंब होउनी भेटे
हा कोण म्हणावे माझा? तितकासा परिचय नाही Continue reading

ऋतुचक्र


पण काय असे मेघांच्या
डोळ्यांत साठले होते
आभाळ नसावे, बहुधा
काळीज फाटले होते…

– वैभव जोशी

परश्या म्हणायचा


परश्या म्हणायचा
“गपकन हात धर आणि मोकळं कर !
तुम्ही बामनं पन ना ss
जेवायचं सोडून
ताटाच्या महिरपीत लै रमता राव “
परश्याचं जाऊ दे ,
पण महिरपीने भूक मारली हे तर नाकारता येत नाही ..
आता तुझ्यावर कविता लिहायची म्हणजे
ब्रम्हांड आठवतं ..

– वैभव जोशी

मला कर्पुराचे जिणे पाहिजे


Vaibhav Joshi
तुला पाहताना तुझा होत गेलो
अता काय माझे असे राहिले
तुझा मोह माझ्यामधे चेतला अन्
दिवे पंचप्राणातुनी तेवले

अशी मुग्ध लाही कधी सोसली ना
कधी पाहिला दाहही कोवळा Continue reading

त्वरित चौकशीचे आदेश दिलेत एवढं एक बरं केलंत


त्वरित चौकशीचे आदेश दिलेत एवढं एक बरं केलंत , साहेब
काय आहे की चॅनल बदलायलाही थोड कॉन्फिडन्स लागतोच ना ..
मग कसं तो शिवाजी – द बॉस वगैरे बघताना
तुम्हीदेखिल समाजकंटकांशी असेच लढताय वगैरे फील आला पटकन .
शेवटी आमचे शिवाजी तुम्हीच !
बरं त्यात एका तासात काही धागेदोरे हाती आले वगैरेचा बोनस दिलात अन काय
भसाभस नारळी भात ताटात घेऊन तोंडच गोड केलं आम्ही
आजच्या वामकुक्षीवर तुमच्या आश्वासनांची पेंग होती ..
बहीण येणारच होती .. तिचा काय दोष
हातावर धागा बांधणे ही तर श्रध्दा .. तिथे काय विषय काढता !
हां नाही म्हणायला
जपून जा , उशीर झालाय म्हणता म्हणता
आजकाल पुणं तसं राहिलं नाही हे म्हणून टाकलं
तर साहेब
आता प्रॉब्लेम हा आहे की झोप येत नाहीये
“अशा गोष्टी घडणारच ” वगैरे टाईप्स एखादी अंगाई गा ना .. प्लीज
उद्या उठून सरळ कामाला लागतो . प्रॉमिस !

  • वैभव जोशी