मी चराचराशी निगडित


प्रेम करणं ही माझी
उपजत पवित्र प्रेरणा आहे.मी
करतो प्रेम झाडांवर, पक्ष्यांवर, आकाशावर,
उन्हावर, चांदण्यावर आणि
माणसांवरदेखिल. मला
ऐकायची नाहीत म्हणूनच तुमच्या Continue reading

Advertisements

ज्ञानी माणसानं


आत्यंतिक प्रेम करावं असं काही
कुणाला आढळलं की नेमकं
उध्वस्त करणारच काही त्याला
सापडलेलं आहे हे सत्य
निष्पाप माणसाला सांगायच नाही असा
ज्ञानी माणसानं निर्धार करायचा
आणि असाही की जे अटळच आहे ते
आपल्यामुळे लवकर न येतो,
जे अटळच आहे त्याला
पूर्वतयारीशिवाय
निर्णायकपणे भिडण्याची कुणाची संधी
लांबणीवर न पडो…
ज्ञानी होण्याची सनद
इतरानांही मिळो –
जळत जळत सारे त्यांना(ही)
कळत जावो…

~ द. भा. धामणस्कर

कंदील विकणारी मुले


उत्साहाने घरचा आकाशकंदील करण्याच्या वयात त्यांना
परोपरीने सजवून विकणारी ही मुले या
दिवाळीची खरेदी करीत हिंडणा-या
श्रीमंत गर्दीची कुणीच लागत नाहीत…
त्यांचे खानदान मुळातच वेगळे :
ती आली आहेत उपासमारीच्या अर्धपोटी संसारातून;
किंवा संप-टाळेबंदीत हकनाक
देशोधडीला लागलेल्या कुटुंबांतून; Continue reading

फुलता येत नाही म्हणून


प्राक्तनाचे संदर्भ – प्राक्तनाचे संदर्भ