अलफाज डॉट कॉम – फारूक एस.काझी


अलफाज डॉट कॉम….धम्माल कथा

#अलफाजडॉटकॉम
आज एक स्वप्न पूर्ण होतंय. खरंतर अलफाज डॉट कॉम काय आहे हे बरेच दिवस एक गुपित होतं. ही माझी वेबसाईट आहे असंच बऱ्याच जणांना वाटलं. या कथा आहेत अलफाज आणि त्याच्या भावविश्वाच्या. तुम्हासर्वांसाठी या कथा घेऊन आलो आहोत.
यात माझ्यासोबत योगदान दिलं ते Yogita Dhote आणि प्रवीण लोहार या मित्रांनी. आमची ओळख फक्त फेसबुकवरची. आम्ही एकदाही भेटलेलो नाही. whatsapp हे एकमेव माध्यम. त्यांची मदत नसती तर कदाचित हे स्वप्न पूर्ण होणं शक्य नव्हतं. Masik Rugved मधून या कथा क्रमश: प्रकाशित झाल्या. आता E Sahity Pratishthan कडून ह्या कथा एका सुंदर ई बुक स्वरुपात तुमच्या समोर आणत आहोत. याचं प्रकाशन जरी १४ नोव्हेबरला असलं तरी याची खरी तारीख २१ ऑक्टोबर ही आहे. तो अलफाजचा वाढदिवस. त्याच्या वाढदिवसाला त्याच्या अब्बूची त्याला भेट…….
या कथा सत्य घटना असून त्यांना कथारूप देण्याचा प्रयत्न आहे.
या कथा फक्त मुलांसाठी नाहीत, हे मी आधीच स्पष्ट केलं पाहिजे. कारण या कथा मुलांशी संबंधित असणाऱ्या सर्वांसाठी आहे. वाचून आपला अभिप्राय जरूर नोंदवा. हे पुस्तक मोफत आहे, फुकट नाही. याची जाणीव वाचकांना निश्चितच असेल. कारण यासाठी तुम्ही आपली काही मिनिटं खर्ची घालायची आहेत. एक मला कळवा, चित्रांसाठी योगिता, सुलेखनासाठी प्रवीण आणि प्रकाशनाला कळवा. आम्ही आपल्या प्रतिसादाची वाट पाहत आहोत.
सादर आहे अलफाज डॉट कॉम आपल्या सर्वांसाठी.
खूप सारं प्रेम आणि दुआ आमच्या सोबत असू दया.
खाली दिलेल्या लिंकवर जाऊन हे पुस्तक download करून घ्या. आनंदाचं एक वर्तुळ पूर्ण करुया. आपल्या मित्र मैत्रिणी यांना शेअर करा. शिक्षक ,तरून कार्यकर्त्यांना विनंती, मुलापर्यंत हे पुस्तक पोचवा. ज्यांच्यासाठी हा अट्टाहास त्यांच्यापर्यंत पोचवण्याची जबाबदारी आता तुमची आहे. तुम्हीच आता आनंदाचे दूत व्हावे.

http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/alfaazdotcom_faruk_kazi.pdf

आपलाच
फारूक एस.काझी

Advertisements

मंदिरे सुनी सुनी


मंदिरे सुनी सुनी, कुठे न दीप काजवा
मेघवाहि श्रावणात ये सुगंधी गारवा

रात्र सूर पेरुनी अशी हळूहळू भरे
समोरच्या धुक्यातली उठून चालली घरे

गळ्यात शब्द गोठले, अशांतता दिसे घनी
दुःख बांधुनी असे क्षितीज झाकिले कुणी

एकदाच व्याकुळा प्रतीध्वनीत हाक दे
देह कोसळून हा नदीत मुक्त वाहू दे

पिंड द्यावा


कवीला कवितेचा पिंड द्यावा
म्हणजे तो आपली
धिंड काढीत नाही
अन् डोहांत पडलेल्या चंद्राची
खिंडही अडवीत नाही…
कवितेचा पिंड ठेवला
की कवीचा पटकन्
कावळा होतो

  • सदानंद रेगे
    Image courtesy: BG Limaye

असेन मी, नसेन मीअसेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे
फुलाफुलांत येथल्या उद्या हसेल गीत हे Continue reading

सुध्दा नाही!


कुठून आला ठराव की दर्वळलोसुध्दा नाही?
अरे इथे तर अजून मी सळसळलोसुध्दा नाही!

उगा भिडवली नजर जगाच्या अथांग डोळ्यांशी मी
असा हरवलो पुन्हा मला आढळलोसुध्दा नाही Continue reading

जमल तर


मधल्या एका दिवसात
कामाठीपुरात सकाळी सकाळी जा
जाऊन एक बच्ची आयटम शोध
रातची दमुन झोपली असली तरी उठव तिला
रेट लाव तिचा ‘आपा’कडे
अन निघ तिथुन तिचा हातात हात धरून
मनातली धग मिटल्याच स्वप्न आणि आनंद
कंडोमसोबत पैक करून Continue reading