पुस्तंकं


सौमित्र

मी गेल्यावर
तुला वाटेल की आपल्या बाबांनी
वाचलियेत ही सारी पुस्तंकं
पण नाही
अर्धंही वाचता आलेलं नाहीय्
येणारही नाही हे ठाउक होतं मला तरी
मी ज़मवत गेलो होतो ही पुस्तंकं
माझ्यासाठी माझ्या बापाने
काहीच सोडलं नव्हतं मागे
ही अक्षर अोळख सोडून फक्तं
जिच्या मागे धावत मी
पोहोचलो आहे इथवर Continue reading

Advertisements

MAGIC LIGHT


समुद्रासमुद्राकडे पाठ करून तुम्ही सगळेच
बुडत चाललेल्या सूर्याकडे पाहणार्‍या मला पहाल तेंव्हा
संध्याकाळचं
नेमकं काय काय बुडत जातं पाण्यातयाची अंधुकशी कल्पना येईल तुम्हालाजसजसा काळोख पाण्याहून खोल होत जातोकाळंशार करत पाणीतळभर उतरू लागतो

तसतसे
पाण्याखालचे मासे
स्वयंप्रकाशित होऊन
रंगीबेरंगी चमचमता
उत्सव सुरू करतात समुद्रतळाशी
तोवर
किनार्यावर उभा असलेला मी
उतरून आलेला असतो खोल
बर्‍याच पायर्‍या स्वतःच्या
अचानक कधीतरी पायर्‍या संपतात
आणि मी न घाबरता बिनदिक्कत
माझं पुढलं पाऊल ठेऊन देतो अज्ञातात
एकेक माणिक मोती दिसू लागतात
येऊ लागते मजा
पायर्‍याशिवाय उतरत जाण्याची
हळूहळू जाणीव होऊ लागते
आपल्या श्रीमंतीची
मग मी पुन्हा एकदा आख्खी रात्र
खर्च करायला सज्ज होतो
आणि माझ्या चेहर्‍यावर
कुठलातरी एक
MAGIC LIGHT दिसू लागतो…..

– सौमित्र

एखाद्या पावसाळी दुपारी


Saumitra

Saumitra

एखाद्या पावसाळी दुपारी, मी तुला घेऊन एखाद्या क्राऊडेड रेस्टॉरंट मध्ये शिरतो,
तेंव्हा तुझं हात माझ्या हातांमध्येच असतो,
खाली मान घालून तू गर्दी मधून चालत असतेस, तशीच माझ्यासोबत एका टेबलाशी बसते,
सगळी गर्दी तुझ्याकडेच अनिनिश नेत्रांनी पाहत असते,
मी ही फक्त तुझ्याकडेच, फक्त तुझ्याकडेच पाहत असतो,
तुझ्याशीच बोलत असतो, तेव्हा आजूबाजूची गर्दी नसते, आपण दोघेच असतो,
अशासाठी कधीतरी एका पावसाळ्यात, एका दुपारी, सहज सोपं बोलत-बोलत तुडुंब गर्दीत माझ्यासोबत जेवायला तू येशील का ? Continue reading

एवढ मात्र खर


हिच्या मिठीत तुझी ऊब शोधण नाही बरं ,
मी तुला विसरत चाललोय एवढं मात्र खरं

हिचा हात घट्ट हातात ठेवला जरा धरून,
तुझ्या माझ्या सारया जागा पाहिल्या पुन्हा फिरून ,
विसर विसर विसरताना पाहिलं तुला स्मरून
तू होतीस ,नव्हतीस, पण हिचं हसणं होतं , Continue reading

एक चोरएक चोर नदीकाठच्या घरात शिरला रात्री
खूप काही मिळेल त्याला अशीच होती खात्री
रितं रिकामं घर सारं फक्त कोरी पानं
काहींवरती लिहिल्या होत्या कविता काही छान
एक कवी छोटा मोठा रहात होता तिकडे
कवितेसोबत जोडत होता आयुष्याची चित्रे Continue reading

आईला वाटत असेल…….


कवी सौमित्र (किशोर कदम) यांची एक नक्की वाचावी अशी कविता.

आईला वाटत असेल की सकाळी रिकामाच तर बाहेर पडतो हातांसोबत ,
पण कुठलं ओझ घेउन परततो हा रोज रात्री?
आईला वाटत असेल कुणास ठाउक काय करतो, कुठे असतो दिवसभर?
काय काय भरून नेतो जाते वेळी?
पुस्तक, पेन, कोरे कागद, न्यापकिन, पेस्ट, टूथब्रश, औषध कुठली,
परवा तर अंडरवेअर भरून घेतली बॅगेत त्याने जणू तो परतणारच नाहीये रात्री घरी
विचारावं म्हणून पुढे व्हावं तर घाई घाईत काहीतरी शोधायला लागतो Continue reading

जगायास तेव्हा खरा अर्थ होता


जगायास तेव्हा खरा अर्थ होता, निरार्थास ही अर्थ भेटायचे
मनासारखा अर्थ लागायचा अन मनासारखे शब्दही यायचे

नदी-सागराचे किनारे कितीही मुक्याने किती वेळ बोलायचे
निघोनी घरी शेवटी जात असता वळूनी कितीदा तरी पहायचे Continue reading