श्रावणओली गाणी


रोज तुझ्या डोळ्यात नव्याने रिमझिमणारा श्रावण मी
आठवणींच्या गंधफ़ुलांनी दरवळणारा श्रावण मी ..

आकाश पावसाचे ते रंग श्रावणाचे.. ओथंबल्या क्षणांचे

हिरवळलेल्या वाटेवरती एकटीच फ़िरताना
पाऊसओल्या गवतावरचे थेंब टपोरे टिपताना Continue reading

जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा


जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा
माझा न राहतो मी हरवून हा किनारा
आभाळ भाळ होते, होती बटा ही पक्षी
ओढून जीव घेते, पदरावरील नक्षी
लाटांस अंतरीच्या नाही मुळी निवारा
डोळे मिटून घेतो, छळ हा तरी चुकेना
ही वेल चांदण्यांची, ओठांवरी झुकेना
देशील का कधी तू थोडा तरी इशारा
नशिबास हा फुलांचा का सांग वास येतो
हासून पाहिल्याचा नुसताच भास होतो
केव्हा तुझ्या खुषीचा उगवेल सांग तारा

गीतकार : मंगेश पाडगांवकर
गायक : सुरेश वाडकर
संगीतकार : श्रीनिवास खळे

दयाघना


दयाघना, का तुटले चिमणे घरटे
उरलो बंदी असा मी

अरे जन्म बंदीवास, सजा इथे प्रत्येकास Continue reading