आता उनाड शब्द वळावयास लागले


आता उनाड शब्द वळावयास लागले !
..सारे लबाड अर्थ कळावयास लागले !

केले न मी उगीच गुन्हेगार सोबती
आरोप आपसूक टळायास लागले !

आली पुन्हा मनात नको तीच चिंतने ..
काही मवाळ चंद्र ढळायास लागले !

घायाळ मी असून रणी खूप झुंजलो
ज्यांना न घाव तेच पळायास लागले ! Continue reading

Advertisements

एकांत माझा


हजार काजव्यांनी पाहिला एकांत माझा,
तुझ्याच आठवांनी उजळला एकांत माझा.

नको जगा विचारू हासण्याचे गुपित माझ्या,
कित्येक हुंदक्यांनी, कोंडला एकांत माझा.

हळूच तू मुक्याने छेडला आलाप केव्हा?
हळूच रे मुक्याने भंगला एकांत माझा.

तुझ्याच वागण्याचा बांधते अंदाज आता
तुझ्यात हा असा रेंगाळला एकांत माझा.

अखेर भेटला नाहीस एकांती मला तू,
तुझ्यासवेच तेव्हा संपला एकांत माझा.

दुरून आज मजला हाक आली ओळखीची,
चुकून चांदण्यानी ऐकला एकांत माझा.

– सुरेश भट

दंगा


तू दिलेले दान मी स्वीकारले कोठे?
एवढेही मी मनाला मारले कोठे?

ही तयारी स्वागताची कोणती आहे?
या स्मशानाला तुम्ही श्रृंगारले कोठे? Continue reading

झंझावात…


जगलो असाच कसातरी ओठातल्या ओठात मी
आता कुठे बोलायला केली खरी सुरुवात मी

झाले कशाचे बोलणे? केले जरा मन मोकळे !
जे राहिले सांगायचे ते टाळले अजिबात मी

माहीतही नाही मला आलो इथे केव्हा कसा
मीही अताशा एकतो ….. दिसलो म्हणे इतक्यात मी

बसुनी गळेकापूंसवे मी काल मैफल जिंकली Continue reading

भल्या पहाटे निघून आले


सख्या तुला भेटण्यास मी या भल्या पहाटे निघून आले !
घरातुनी चोरपावलांनी लपून आले.. जपून आले !

तुझ्याच स्वप्नात रात गेली…तुझ्याच स्वप्नात जाग आली…
तुझ्याच स्वप्नात जागणा~या जगातुनी मी उठून आले ! Continue reading

बरे नाही!


हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही
चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही

जे तुला दिले होते तेच ओठ दे माझे
मागचे जुने देणे टाळणे बरे नाही Continue reading

आम्ही!


जगाची झोकुनी दुःखे सुखाशी भांडतो आम्ही
स्वतःच्या झाकुनी भेगा मनुष्ये सांधतो आम्ही

फुकाचे काय शब्दांना मिळे दिव्यत्व सत्याचे
घराची राखरांगोळी कपाळी लावतो आम्ही Continue reading