अजूनी वाट एकाकी गं


अवसेची ही रात उजळते, अंधाराच्या वाती गं
शोधित फिरते सुर्य उद्याच्या, अजूनी वाट एकाकी गं ॥ धॄ॥

सुर्य लोपता, अवतीभवती विश्व काजळी उरते गं ।
कशी शांतता यास म्हणू, हे वेध वादळी भलते गं।
लाटांवर भिरभिरते नौका, अणि किनारा नाही गं ॥१॥ Continue reading

क्षणात


सुजित,
तुझा म.क.सं. संकेतस्थळ पाहिलं… रोज वाचतही असतो…
मराठी कवितेंसाठीचं हे तुझ काम खुपच आश्वासक अणि नव्या कवींना उर्मी देणारं आहे..
खुप खुप धन्यवाद अणि अभिनंदन…
हे संकेतस्थळ एवढं देखणं आहे की माझ्या काही कविता इथे असाव्यात असा मोह होतो आहे.
त्यासाठीसुध्दा हा पत्रप्रपंच…!! एक कविता सोबत देत आहे. आवडल्यास नक्की कळविणे.

क्षणात होते जांभ गुलाली
क्षणात सांज का लाल दिसे
क्षणात दाटे अबीर भोवती
क्षणात चांदणपूर असे Continue reading