पिंड द्यावा


कवीला कवितेचा पिंड द्यावा
म्हणजे तो आपली
धिंड काढीत नाही
अन् डोहांत पडलेल्या चंद्राची
खिंडही अडवीत नाही…
कवितेचा पिंड ठेवला
की कवीचा पटकन्
कावळा होतो

  • सदानंद रेगे
    Image courtesy: BG Limaye

दडपण


हे आकाश

असं दबा धरुन बसलंय केव्हापासनं? या ढगांचं

प्रेत कुणीच कसं अजून उचलीत नाही?

झाडांच्या हाडांची

तर झाली आहेत काडें

हे सगळे….

सगळं एकदाचं कोसळत का नाही?

– सदानंद रेगे