पांढर्‍या शुभ्र हत्तींचा


पांढर्‍या शुभ्र हत्तींचा , रानातून कळप निघाला
संपूर्ण गर्द शोकाच्या गर्तेतही मिसळून गेला

त्या गुढ उतरत्या मशिदी , पक्ष्यांनी गजबजलेल्या
कल्लोळ पिसांचा उडत्या पंखात लपेटुन बुडाल्या Continue reading

Advertisements

वाट….


तू येशील म्हणून मी वाट पहातो आहे,
ती ही अशा कातर वेळी,

उदाच्या नादलहरी सारख्या
संधी प्रकाशात…

माझी सर्व कंपने इवल्याशा ओंजळीत
जमा होतात….

अशा वेळी वाटेकडे पाहाणे ,
सर्व आयुष्य पाठीशी बांधून एका सूक्ष्म
लकेरीत तरंगत जाणे;
जसे काळोखातही ऎकू यावे दूरच्या
झऱ्याचे वहाणे….

मी पहतो झाडांकडे , पहाडांकडे,
तू येशील म्हणून अज्ञाताच्या पारावरती
एक नसलेली पणती लावून देतो…..

आणि आई नसलेल्या पोरासारखे हे माझे
शहाणे डोळे, हलकेच सोडून देतो
नदीच्या प्रवाहात…

– संध्याकाळच्या कविता, ग्रेस