अजून उजाडत नाही गंअजून उजाडत नाही गं, नाही गं॥

दशकांमागुन सरली दशके
अन् शतकांच्या गाथा गं,
ना वाटांचा मोह सुटे, वा
ना मोहाच्या वाटा गं,
पथ चकव्याचा गोल सरळ वा
कुणास उमगत नाही गं,
प्रवास कसला फरफट अवघी,
पान जळातुन वाही गं॥ Continue reading

Advertisements

निर्माल्य


मी रात्रीचं एक पाहून ठेवलंय-
– ती होता होता बायको ओरडते
– मध्यरात्री कुत्री ओरडतात
– पहाटे पहाटे कोकिळा ओरडते
– आणि उजाडता उजाडता दूधवाला ओरडतो…….

मी रात्रीचं एक पाहून ठेवलंय-
– ती होता होता कविता आठवते Continue reading

झोप


झोप घेतायत सारे…झोप घेतायत…

बायको…मुलगी…नातवंडं…पतवंडं…
विझल्या दिव्यातील निद्रिस्त अंधारातून,
काळोखाच्या तळाशी
अंधारल्या खोल्यांतून…माजघरातून…
झोप घेतायत सारे…झोप घेतायत…

स्ट्रॉमधून कोल्ड्रिंक शोषून घ्यावं
तसे खोल श्वासातून झोप ओढून घेतायत कणाकणांतून…
मिटक्या मारतायत…!
कसलंच भान नसल्याचं किती उत्तान समाधान Continue reading

बाबाच्या डोळ्यामध्ये पावसाचे ढगआई आई ये ना जरा… बाबाकडे बघ
बाबाच्या डोळ्यामध्ये पावसाचे ढग !

बाबा असा बघायला दिसे ना गं बरा
आळीमिळी गुपचिळी… पडलेला वारा !

हले नाही… डुले नाही… जणू काही फोटो
आवाजही त्याला माझा लांबूनच येतो ! Continue reading

दिवानों की बाते हैदिवानों की बाते है
इनको लबपर लाये कौन ?
इतना गेहेरा जाये कौन ?
खुदको यु उलझाये कौन ?

जो तु समझा अपना था
वो लमहों का सपना था
हमने दिल को समझाया
अब हमको समझाये कौन ? Continue reading

उत्कट-बित्कटउत्कट-बित्कट होऊ नये, भांडू नये, तंडू नये..
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये

नको कुठला नवा भार, जुनेच गुंते शिल्लक फार..
सूर गाठ-नीर गाठ, राहून द्याव्यात, ओढू नये…
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये Continue reading

ब्लँक कॉल


हल्ली असा अवेळीच येतो कधी फोन
आणि कळतच नाही बोलतय कोण
बोलतच नाही मुळी पलीकडे कोणी
ऐकू येत रहातं फक्त डोळ्यातलं पाणी …(१)

कळताच मलाही मग थोडंसं काही
मीही पुढे मग बोलतंच नाही
फोनच्या तारेतून शांतता वाहते
खूप खूप आतून अजून काही सांगते …(२) Continue reading