आयुष्य तेच आहे (ही प्रसिद्ध गझल नवीन शेरांसह)


आयुष्य तेच आहे
अन् हाच पेच आहे…

आता म्हणू उन्हाला
हे चांदणेच आहे…

सुख पांघरू कसे मी
ते तोकडेच आहे… Continue reading

Advertisements

हारण्यास एक नवा, डाव पाहिजे


रुबाई:-

सोडले कालच्या किनाऱ्याला
वादळे घेतली निवाऱ्याला
घेतले मी नवे पुन्हा फासे
हारण्याची नशा जुगाऱ्याला

गज़ल :-

हारण्यास एक नवा, डाव पाहिजे
साकळे जुना,नवीन घाव पाहिजे……

फत्तरास ही फुटू शकेल पालवी
आसवात तेव्हढा प्रभाव पाहिजे……..

अंध:कार संपणार आज ना उद्या
फक्त एक ज्योतीचा उठाव पाहिजे…..

दु:ख हेच एकमेव सत्य जीवनी
त्यातही हसायचा सराव पाहिजे……

– संगीता जोशी

आयुष्‍य


आयुष्‍य तेच आहे
अन् हाच पेच आहे

बोलु घरी कुणाशी
तेही सुनेच आहे

तू भेटसी नव्‍याने
बाकी जूनेच आहे

केलीस याद तु ही
का हे खरेच आहे

– संगीता जोशी

आयुष्य तेच आहे


आयुष्य तेच आहे
रोग जुनेच आहेत
उपचार घेतो त्याला
नाव नवेच आहे

आयुष्य तेच आहे
स्वप्नं खोटेच आहे
भानावर येताच
वास्तवाचे चटकेच आहे Continue reading