फिटे अंधाराचे जाळे


फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश
दरीखोर्‍यातून वाहे एक प्रकाश, प्रकाश

रान जागे झाले सारे, पायवाटा जाग्या झाल्या
सूर्य जन्मता डोंगरी, संगे जागल्या सावल्या
एक अनोखे लावण्य, आले भरास भरास Continue reading

Advertisements

तुला पाहिले मी नदीच्या किनारी


तुला पाहिले मी नदीच्या किनारी
तुझे केस पाठीवरी मोकळे

तुझी पावले गे धुक्याच्या महाली
ना वाजली ना कधी नादली
निळा गर्द भासे नदीचा किनारा
न माझी मला अन तुला सावली Continue reading

श्रावणओली गाणी


रोज तुझ्या डोळ्यात नव्याने रिमझिमणारा श्रावण मी
आठवणींच्या गंधफ़ुलांनी दरवळणारा श्रावण मी ..

आकाश पावसाचे ते रंग श्रावणाचे.. ओथंबल्या क्षणांचे

हिरवळलेल्या वाटेवरती एकटीच फ़िरताना
पाऊसओल्या गवतावरचे थेंब टपोरे टिपताना Continue reading

माझिया मना, जरा थांब ना


माझिया मना, जरा थांब ना
पाऊली तुझ्या माझिया खुणा
तुझे धावणे अन मला वेदना

माझिया मना, जरा बोल ना
ओळखू कसे मी, हे तुझे ऋतू Continue reading

काही बोलायाचे आहे, पण बोलणार नाही


काही बोलायाचे आहे, पण बोलणार नाही
देवळाच्या दारामध्ये, भक्ती तोलणार नाही

माझ्या अंतरात गंध कल्प कुसुमांचा दाटे
पण पाकळी तयांची, कधी खुलणार नाही
नक्षत्रांच्या गावातले मला गवसले गुज
परि अक्षरांचा संग त्याला मिळणार नाही Continue reading

त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला मी……


त्या कोवळया फुलांचा बाजार पाहीला
पैशात भावनेचा व्यापार पाहीला मी

अंधार वेदनांनी आक्रंदतो तरीही
नजरेत वासनेचा श्रृंगार पाहीला मी Continue reading

अवेळीच केव्हा दाटला अंधार


अवेळीच केव्हा दाटला अंधार
तिच्या गळा जड झाले काळे सर
एकद मी तिच्या डोळ्यात पाहिले
हासताना नभ कलून गेलेले Continue reading