छबीदार सुरत साजिरी


छबीदार सुरत साजिरी, दिसे गोजिरी
बरी आवडलीस माझ्या मना

घडी घडी अरे मनमोहना
हसुनी गुणीजना देखता नको रे बोलू मशी Continue reading

Advertisements

सांगा मुकुंद कुणि हा पाहिला


सांगा मुकुंद कुणि हा पाहिला
सांगा मुकुंद कुणि हा पाहिला

रासक्रीडा करिता वनमाळी हो,
सखे होतो आम्ही विषयविचारी
टाकुनि गेला तो गिरिधारी
कुठे गुंतून बाई हा राहिला
सांगा मुकुंद कुणि हा पाहिला

गोपी आळविती, हे ब्रजभूषणा हे
वियोग आम्हालागी तुझा ना साहे
भावबळे वनिता व्रजाच्या हो
बोलावुनि सुताप्रती नंदाजीच्या
प्रेमपदी यदुकुळटिळकाच्या
म्हणे होनाजी, देह हा वाहिला
सांगा मुकुंद कुणि हा पाहिला

गीत – शाहिर होनाजी बाळा
संगीत – वसंत देसाई
स्वर – आशा भोसले, पंडितराव नगरकर
चित्रपट – अमर भूपाळी (१९५१)

लटपट लटपट लटपट लटपट


लटपट लटपट लटपट लटपट
तुझं चालणं ग मोठ्या नखऱ्याचं
बोलणं ग मंजुळ मैनेचं
नारी ग, नारी ग Continue reading

घनःश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला


घनःश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला
उठिं लवकरि वनमाळी उदयाचळी मित्र आला

आनंदकंदा प्रभात झाली उठी सरली राती
काढी धार क्षीरपात्र घेउनी धेनु हंबरती
लक्षताती वासुरें हरि धेनु स्तनपानाला Continue reading