असेन मी, नसेन मीअसेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे
फुलाफुलांत येथल्या उद्या हसेल गीत हे Continue reading

Advertisements

विजनामधले पडके देऊळ


विजनामधले पडके देऊळ
ओशट ओला तो गाभारा
काळोखातील शिवलिंगावर
अभिषेकाची अखंड धारा

– शांता शेळके, अनोळखी

पाऊस


पावसाच्या धारा येती झरझरा
झांकळलें नभ, वाहे
सोंसाट्याचा वारा

रस्त्याने ओहोळ जाती खळखळ
जागजागीं खाचांमध्ये तुडुंबले
जळ Continue reading

Advertisements

बाल संभाजी


चिमुकली पगडी झळके शिरी

चिमुकली तलवार धरी करी

चिमुकला चढवी वर चोळणा

चिमुकला सरदार निघे रणा

छ्बुकडा चिमणा करितो गुण

चिमुकले धरले मग रंगण

दुडददुडा पळ्ता पळ्ता पडे

गडबडे, रडता मुख बापुडे !

– महादेव मोरेश्वर कुंटे, राजा शिवाजी

– सुवर्णमुद्रा , शांता ज. शेळके

Advertisements

ओलेत्या पानात


ओलेत्या पानात, सोनिया उन्हात भरुन मेघ आले
डहाळी जणू नवी नवरी हळद रंग ओले
साद ओली पाखराची, ओढ जागे पावसाची

डोहाळे या मातीला, सूर बोले थेंबातला
वाटा आता कस्तुरी, गंध उमले कोंबातला
थरारे मन, वारे नविन, सृजन रंग न्हाले

स्वप्न लहरे नवे कांचनी, धून हरवे रानातूनी
राधिका झाली बावरी, जन्म लहरे मुरलीवरी
तृप्ती निराळी, उजळीत डोळी, स्वर हे कुठून आले

हरपून दाही दिशा, ओढाळ झाल्या कशा
शिणगार करती ऋतू, प्रीत स्पर्शात जाई उतू
अभिसार न्यारा, हळवा शहारा, अरुपास रुप आले

 • [slider title=”More Info” group=”More Info”]

  गीतकार : शांता शेळके
  गायक : अनुराधा पौडवाल
  संगीतकार : श्रीधर फडके

  [/slider]

Advertisements

माजो लवताय डावा डोळा


माजो लवताय डावा डोळा
जाई जुईचो गजरो माळता
रतन अबोली केसान फुलता
काय शकून … शकून गो सांगताय माका …

माझे कानार भवर भवता
माझे गालाक बाई भिडता
सगळ्या अंगार शिरशिर येता
माजे पदर वार्यावर उडता
मनचो बकुल गो परमळता
काय शकून … शकून गो सांगताय माका …

माझे डोळ्यात सपनाच्या वाटेर
कोन बाई येता न् जाता
माझे ओठार माझेच गाणे
कोन बाई येऊन गाता
माजोच बोल बाई हुलयता
काय शकून … शकून गो सांगताय माका …

 • [slider title=”More Info” group=”More Info”]

  गीतकार : शांता शेळके
  संगीतकार : पं. हृदयनाथ मंगेशकर
  चित्रपट : महानंदा

  [/slider]

Advertisements

कुवत


‘एकेकाचं आपल्या पत्नीवर किती जिवापाड प्रेम असतं.’ ती म्हणाली, ‘ बघा ना. शहाजहाननं आपल्या मुमताजसाठी प्रेमाचं प्रतीक म्हणुन संगमरवरी ताजमहाल बांधला. नाही तर तुम्ही !’
‘अग पण’ तो म्हणाला, ‘ शहाजहान बादशहा होता. त्याची बरोबरी मी कशी करणार ! पण मी नाही का आप्ल्या स्वयंपाकघरात तुझ्यासाठी ओटा बांधला ? माझी कुवत तितकीच ! ‘

– सुवर्णमुद्रा , शांता ज. शेळके

Advertisements