हलले जरासे चांदणे


 जातक, विंदा जातक, विंदा

जातक, विंदा

Posted by मराठी कविता संग्रह on 11 February 2016

Advertisements

भुतावळकिर्र रात्री सुन्न रात्री
झर्र वारा भुर्र पानी;
शार वाडा गार भिंती,
दार त्याचे हस्तिदंती.

कोण आले ? कोण आले ?
दार आपो-आप खोले !
आली आली भुताबाई;
तीन माणसे रोज खाई Continue reading

मानवाचे अंती एक गोत्र


मिसिसिपीमध्ये मिसळू दे गंगा;

-हाईनमध्ये ‘नंगा’ करो स्नान.

सिंधुसाठी झुरो आमेझान थोर’

कांगो बंडखोर टेम्स साठी Continue reading

लागेल जन्मावें पुन्हां


माझी न घाई कांहिही, जाणून आहे अंतरी,
लागेल जन्मावें पुन्हां नेण्या तुला मझ्या घरी.

तूं झुंजुमुंजू हासशी, जाईजुईचें लाजशी;
मी वेंधळा मग सांडतॉ थोडा चहा बाहीवरी. Continue reading

रचना


स्वप्नामध्ये रचिल्या ओळी
यमक मला नच सापडले!
अर्थ चालला अंबारीतुन
शब्द बिचारे धडपडले; Continue reading

जडाच्या जांभया


रडण्याचेंही बळ नाही;
हसण्याचेही बळ नाही;
मज्जा मेली; इथें आतां
जीवबाची कळ नाही. Continue reading

हीच दैना


सडलेल्या पंखांनांही
उडण्याचा लागे ध्यास
हाच माझा थोर गुन्हा
हाच माझा रे हव्यास. Continue reading