ते


त्या वेळी
तू आलास
आणि म्हणालास
” एक्मेकांवर प्रेम करा ! ”

त्यांनी तुला क्रुसावर खिळले !

मग Continue reading

Advertisements

एवढे दे पांडुरंगा !


माझिया गीतात वेडे
दु:ख संतांचे भिनावे;
वाळल्या वेलीस माझ्या
अमॄताचे फूल यावे !

आशयांच्या अंबरांनी
टंच माझा शब्द व्हावा;
कोरडा माझा उमाळा
रोज माधुर्यात न्हावा ! Continue reading

रोजगात्रागात्राला फुटल्या
तुझ्या लावण्याच्या कळ्या
जन्म वेढून बांधिती
तुझ्या भासांच्या साखळ्या!

रोज तुझ्या वेणीसाठी
डोळे नक्षत्रे खुडती;
रोज तुझ्या भेटीसाठी
बाहू आसवांचे होती!

– (रंग माझा वेगळा) सुरेश भट

रंग माझा वेगळा!


रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा!
गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा!

कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे;
मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा! Continue reading