वाट पाहुनी जीव शिणला


वाट पाहुनी जीव शिणला
दिसा मागूनी दिसं टळला
सुर्व्या आला, तळपून गेला
मावळतीचा खळीगाल आला
गडणी, सखे गडणी

कुटं गुंतला, सब्द इसरला
देऊन अपुल्या सजणीला
डोंगर वलंडून चांद चालला
चांदणं चारून धरतीला

मासं जोडी जोडीनं पव्हती
पाखरं संगती, संगतीनं फिरती
एक डहाळीवर बिलगून फुलती
फुल कळ्या त्या येलाला

गीत – योगेश
संगीत – आनंदघन
स्वर – लता मंगेशकर
चित्रपट – साधी माणसं (१९६३)

Advertisements

राजाच्या रंगम्हाली


राजाच्या रंगम्हाली, सोन्याचा बाई पलंग
रूप्याचा खांब त्येला, मोत्याची झालर
राजाच्या रंगम्हाली, पराची मऊ गादी
जरीचा चांदवा, रेशमी शिणगार
गडनी, सजनी, गडनी सजनी ग

राजाच्या रंगम्हाली, रानी ती रुसली
बोलं ना, हसं ना, उदास नजर
राजाच्या रंगम्हाली, राजानं पुशिलं
डोळ्याची कमळं उघडा, व्हटांची डाळिंबं
गडनी, सजनी, गडनी सजनी ग

राजाच्या रंगम्हाली, रानी वो सांगिते
सुना सोन्याईन म्हाल, कशाला बडीवार
मायेच्या पूतापायी, रानी ग रडीते
आसवांची गंगा व्हाते, भिजीला पदोर
गडनी, सजनी, गडनी सजनी ग

गीत – योगेश
संगीत – आनंदघन
स्वर – लता मंगेशकर, उषा मंगेशकर
चित्रपट – साधी माणसं (१९६३)

माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पानी जातं


हा या पोस्टचा सारांश आहे.

माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पानी जातं
गुलाब, जाई, जुई, मोगरा फुलवीतं

दादाच्या मळ्यामंदी, मोटंचं मोटं पानी
पाजिते रान सारं, मायेची वयनी
हसत डुलत, मोत्याचं पीक येतं

लाडकी ल्येक राजाचा ल्योक
लगीन माझ्या चिमनीचं

सावळा बंधुराया, साजिरी वयनीबाई
गोजिरी शिर्पा हंसा, म्हायेरी माज्या हाय
वाटेनं म्हयेराच्या धावत मन जातं

गडनी, सजनी, गडनी सजनी गडनी ग

राबतो भाऊराया, मातीचं झालं सोनं
नजर काढू कशी, जीवाचं लिंबलोनं
मायेला पूर येतो, पारुचं मन जातं

गीत – योगेश
संगीत – आनंदघन
स्वर – लता मंगेशकर
चित्रपट – साधी माणसं (१९६३)