अशी पाखरे येती


अशी पाखरे येती, आणिक स्मृति ठेवुनी जाती
दोन दिसांची रंगतसंगत, दोन दिसांची नाती ॥ ध्रु ॥

चंद्र कोवळा, पहिला वहिला, झाडामागे उभा राहिला
जरा लाजुनि, जाय उजळुनी, काळोखाच्या राती ॥ १ ॥

फुलून येता फुल बोलले, मी मरणावर हृदय तोलले
नव्हते नंतर, परी निरंतर, गंधित झाली माती ॥ २ ॥

हात एक तो हळु थरथरला, पाठीवर मायेने फिरला
देवघरातिल समईमधुनी, अजून जळती वाती ॥ ३ ॥

कुठे कुणाच्या घडल्या भेटी, गीत एक मोहरले ओठी
त्या जुळल्या हृदयांची गाथा, सूर अजुनही गाती ॥ ४ ॥

[slider title=”अधिक माहिती”]

अधिक माहिती

गायक/गायिका: सुधीर फडके
संगीतकार: यशवंत देव
गीतकार: मंगेश पाडगांवकर
अधिक टिपा: या गाण्याचे शब्द, चाल आणि गायन याची जादू अशी आहे कि, हे गाणे तूम्ही त्या सूरांचा आधार घेतल्याशिवाय वाचूच शकत नाही.

[/slider]

अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी


अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी
लाख चुका असतील केल्या, केली पण प्रीती

इथे सुरु होण्याआधी, संपते कहाणी
साक्षीला केवळ उरते, डोळ्यांतील पाणी
जखम उरी होते ज्यांच्या, तेच गीत गाती

सवर् बंध तोडूनी जेव्हा नदी धुंद धावे
मीलन वा मरण पुढे, हे तिला नसे ठावे
एकदाच आभाळाला अशी भिडे माती

गंध दूर ज्याचा, आणिक जवळ मात्र काटे
असे फुल प्रीती म्हणजे कधी हाय वाटे
तरी गंध धुंडीत धावे जीव तुझ्यासाठी

आर्त गीत आले जर हे कधी तुझ्या कानी
गूज अंतरीचे कथिले तुला ह्या स्वरांनी
डोळ्यांतून माझ्यासाठी लाव दोन ज्योती

गीतकार :मंगेश पाडगांवकर
गायक :अरुण दाते
संगीतकार :यशवंत देव

सर्वस्व तुजला वाहुनी, माझ्या घरी मी पाहुणी


सर्वस्व तुजला वाहुनी, माझ्या घरी मी पाहुणी
सांगू कसे सारे तुला, सांगू कसे रे याहुनी

घरदार येते खावया, नसते स्मृतींना का दया ?
अंधार होतो बोलका, वेड्यापिशा स्वप्नांतुनी Continue reading

अर्धीच रात्र वेडी अर्धी पुरी शहाणी


अर्धीच रात्र वेडी अर्धी पुरी शहाणी
भोळ्या सदाफुलीची ही रोजची कहाणी

फुलले पुन्हा पुन्हा हा केला गुन्हा जगाचा
ना जाहले कुणाची पत्त्यामधील राणी Continue reading

एवढे तरी करून जा


एवढे तरी करून जा
हा वसंत आवरून जा

ही न रीत मोहरायची
आसवांत मोहरून जा

तारकांपल्याड जायचे
ह्या नभास विस्मरून जा Continue reading

केळीचे सुकले बाग, असुनिया पाणी


केळीचे सुकले बाग, असुनिया पाणी
कोमेजलि कवळी पाने, असुनि निगराणी

अशि कुठे लागली आग, जळति जसे वारे
कुठे तरी पेटला वणवा, भडके बन सारे Continue reading

कुणि जाल का, सांगाल का, सुचवाल का ह्या कोकिळा ?


कुणि जाल का, सांगाल का, सुचवाल का ह्या कोकिळा ?
रात्री तरी गाऊ नको, खुलवू नको अपुला गळा

आधीच संध्याकाळची बरसात आहे लांबली
परत जाता चिंब चुंबन देत दारी थांबली
फार पूर्वीचा दिला तो श्वास साहुन वाळला
आताच आभाळातला काळोख मी कुरवाळला

सांभाळुनी माझ्या जिवाला मी जरासे घेतले
इतक्यात येता वाजली हलकी निजेची पावले
सांगाल का त्या कोकिळा, की झार होती वाढली
आणि द्याया दाद कोणी रात्र जागुन काढली

गीत – आ. रा. देशपांडे ’अनिल’
संगीत – यशवंत देव
स्वर – पं. वसंतराव देशपांडे