दिवानों की बाते हैदिवानों की बाते है
इनको लबपर लाये कौन ?
इतना गेहेरा जाये कौन ?
खुदको यु उलझाये कौन ?

जो तु समझा अपना था
वो लमहों का सपना था
हमने दिल को समझाया
अब हमको समझाये कौन ? Continue reading

Advertisements

उत्कट-बित्कटउत्कट-बित्कट होऊ नये, भांडू नये, तंडू नये..
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये

नको कुठला नवा भार, जुनेच गुंते शिल्लक फार..
सूर गाठ-नीर गाठ, राहून द्याव्यात, ओढू नये…
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये Continue reading

ब्लँक कॉल


हल्ली असा अवेळीच येतो कधी फोन
आणि कळतच नाही बोलतय कोण
बोलतच नाही मुळी पलीकडे कोणी
ऐकू येत रहातं फक्त डोळ्यातलं पाणी …(१)

कळताच मलाही मग थोडंसं काही
मीही पुढे मग बोलतंच नाही
फोनच्या तारेतून शांतता वाहते
खूप खूप आतून अजून काही सांगते …(२) Continue reading

मैखानाव्हिस्की बरोबर करायचा असतो
स्वप्नील रोमान्स…क्षण दोन क्षणांचा
अन रमवर पडायचे असते तुटून प्रच्छन्न प्रेमिके सारखे….

व्होडकाचे करायचे असते स्वागत
बर्फाळ प्रदेशातून आलेल्या राजनैतिक पाहुण्यासारखे… Continue reading

सरीवर सर..


दूर दूर नभपार डोंगराच्या माथ्यावर
निळे निळे गार गार पावसाचे घरदार
सरीवर सर..

तडातडा गारगार गरागरा फ़िरे वारा
मेघियाच्या ओंजळीत वीज थिजलेला पारा
दूरवर रानभर नाचणारा निळा मोर
मोरपीस मखमल उतू गेले मनभर Continue reading

किती ? – एक जनरल छापील फॉर्म


तू आवडतोस/तेस
तू खूप आवडतोस/तेस
तू प्रचंड आवडतोस/तेस
तू सॉलीड आवडतोस/तेस
तू अफाट आवडतोस/तेस
तुझ्यावाचून जगणे नाही इतका/की आवडतोस/तेस
श्वास घेणं शक्य नाही इतका/की आवडतोस/तेस
तू नसशील तर नसेन मी ही इतका/की आवडतोस/तेस Continue reading

गुलाबच्या फुलाचे भाषांतर


गौरगुलाबी चर्येवर
लालकेसरी टिकली टेकलेली…
लालचुटुक ओठांत
गडद गुलाबी गुपिते मिटलेली….
लालगुलाबी वस्त्रांत
सौम्य गुलाबी कांती लपेटलेली…
मंद गुलाबी गंधाची
एक देहकुपी लवंडलेली…
सभोवताल्यांशी राखलेलं
एक फिकटं गुलाबी अंतर…
तू ?… छे! … तू नव्हेसचं तू;
तू तर गुलाबच्या फुलाचे भाषांतर !!

– संदीप खरे

Image courtesy: Sujit Balwadkar

आपल्या येण्याची जाणीव आम्हाला प्रतिक्रियांद्वारे करून द्या. आपली प्रतिक्रिया इथे जरूर नोंदवा.

अपडेट्स मिळवण्यासाठी हा URL वरील URL bar मध्ये paste करा – http://feedburner.google.com/fb/a/mailverify?uri=wordpress/fQXr