मौन


शिणलेल्या झाडापाशी
कोकिळा आली
म्हणाली, गाणं गाऊ का ?
झाड बोललं नाही
कोकिळा उडून गेली.

शिणलेल्या झाडापाशी
सुग्रण आली
म्हणाली, घरटं बांधु का ?
झाड बोललं नाही
सुग्रण निघून गेली. Continue reading

Advertisements

अन्यथा


तत्त्वज्ञान त्याचे विवेचन करील
पण कविता त्याचा शोध लावते
कारण
तो आणि आपण
यांच्यातील संबंध
नाही मीमांसेचा,
तो आहे फक्त
काव्याचा
आणि म्हणूनच
बेबलच्या सनातन मनोर्‍यामधे
जेव्हा नेति – अस्तीचे वादंग
मीमांसक माजवीत असतात, Continue reading

निवास


खुप खुप वर्षांपूर्वी
आकाशाशी
माझा करार झाला
आणि आकाशगंगेतील
ती छोटी तारका,
निळ्या पारख्या प्रकाशाचा,
पिसारा फुलवणारी,
माझ्या मालकीची झाली
तेव्हापासून
पृथ्वीवर जेव्हा Continue reading

तेव्हापहाटेच्या काळोखी फांद्यातून
अवेळी जागलेल्या कोणाएका
कोकिळेने
भ्रमिष्टपणे
दिली भिरकावून आकाशावर
कोठल्या स्वप्नाच्या स्पंजात रुतणारी
चौधारी
पल्लेदार स्वरावळ
नंतर सारं स्तब्ध….
संगमरवरी स्तंभाला टेकून Continue reading

सातवा


चमच्यांच्या स्टँडवर

सात चमचे होते

एक चमचा एक दिवशी

गहाळ झाला

उरलेल्या सहांच्या गळ्यातून

प्रथमच

अनावर हुंदका फुटला

‘ ती असती तर’ – ते उद्गारले, Continue reading