तू म्हणालास ना


Mamata

तू म्हणालास ना
म्हणून आता नको बोलूया आपण
या आकाशगंगेवर.

नको बोलूया
त्या तारांगणाची भाषा
तो धूमकेतू, ती उल्का
नकोच त्यांचा उल्लेख
आता कशातही. Continue reading

Advertisements

भेट अथवा …


Mamata

भेट अथवा सांग वाटा परतण्याच्या..
शक्यता सारया मिटू दे एकदाच्या.!

डौल त्यांच्या चालण्याचा वेगळा पण..
वेगळ्या माझ्या कहाण्या रांगण्याच्या.! Continue reading

असच काहीतरी होत


Mamata Sindhutai

बंद शॉवरखाली
पुर्ण कपड्यानिशी
उभ राहिल्यावरही
अवघा देह निथळत राहावा..
.
.
.
.
भर गर्दित
तुझी आठवण आली की
‘मनाचं’असच काहीतरी होत.!…

– ममता सिंधुताई

वाटून घ्यावे वाटलेShare on Facebook

वाटून घ्यावे वाटले.. वाट्यातले..
देवू जरा आपापल्या नशिबातले.!

पसरून झोळी काय मागावे तुला..
जर द्यायचे तर दे तुझ्या ताब्यातले.!

शोधू कसे पाझर सुन्या नजरेत मी..
गेले कुठे आता झरे डोहातले.?!

– ममता सिंधुताई

आठवतंय ?


आठवतंय?
किती कापऱ्या आवाजात विचारलं होत मी
“जाऊ.?”
अन तू.?
नाही, तो तू नव्हतासच
तो एक कोरडा आवाज होता फक्त
“जा…”
तिथेच साऱ्या शक्यता मावळल्या..
Continue reading

कसं सांगू वेडाबाई


तावातावाने भांडण आवडत मला..तुझ्यासोबत.
त्या दिवशी पण तेच झालं..
तुझ्यासारख्या ” नास्तिक ” माणसाला
” देवाचा गाव ” दाखवायला निघाले होते.
आणी ” तू “?
तुझ्या वाळवंटातून बाहेर यायला तयार नव्हतास.

” तुझा देव दाखव आधी…” Continue reading

जर ठरले आहे


जर ठरले आहे तर ते घडणारच
तू ढासळताना मी कोसळणारच!!

अंदाज ढगांचा जर ठाम निघाला
भर ऊन असू दे पाउस पडणारच.!!

शेवट झाल्यावर सुरूवात कशाला?
या सुरूवातीला शेवट असणारच.!! Continue reading