मी किनारे सरकताना पाहिले


मी किनारे सरकताना पाहिले
मी मला आक्रंदताना पाहिले……

कोणती जादू अशी केलीस तू
मी धुके गंधाळताना पाहिले……
पाकळ्या खंतावूनी जेव्हा गळाल्या
मी फुलांना झिंगताना पाहिले……
लोक ते मागे फिराया लागले
मी तुला रेंगाळताना पाहिले……

– नीता भिसे

Advertisements

ऐन वेळी जरी मोगरा टाळतो


ऐन वेळी जरी मोगरा टाळतो
तू मला माळशी,मी तुला माळतो……

सावरू ही नका आसवांनो मला
मीच माझे आता दुःख सांभाळतो…… Continue reading

तू माझा स्वर तू माझी लय


तू माझा स्वर तू माझी लय
तू माझ्या गीतांचा आशय…..

पावसात ही लगबग कसली
तोल तुझा जाण्याचे हे वय……

दुनिये तू जिंकलीस कोठे
मी केला माझाच पराजय……

ये मरणा,येरे ये मरणा
मज वाटे ह्या जगण्याचे भय……

– प्रदीप निफाडकर

वेळ झाली निघून जाण्याची


रुबाईः चार ओळींची रचना

बोललो होतो कधी
ऐक ही माझी कहाणी
का तुझ्या डोळ्यांत आले
कारणावाचुनी पाणी

गज़लः

ही कहाणी तुझ्याच न्हाण्याची
तापलेल्या अधीर पाण्याची Continue reading