नाजूकता ऐसी कुणी पाहिली नाही कधी


नाजूकता ऐसी कुणी पाहिली नाही कधी – जुनी पोस्ट

Image Courtesy – Dr. Shirish Shirsat

 

Advertisements

आलो तुझ्या दुनियेत


आलो तुझ्या दुनियेत, नव्हतो चोर वा डाकू आम्ही
एकही ना चिज इथली, घेऊनी गेलो आम्ही
ते ही असो, आमुच्यासवे आणिला ज्याला इथे
भगवन, अरे तो देहही मी टाकुनी गेलो इथे

– भाऊसाहेब पाटणकर

असा धोका दिला


हाय ! तु आहे तरीही आम्हा असा धोका दिलासांग ना मृत्यो, तुला आहे कधी का मी दिला
जन्मांतरी ज्या ज्या क्षणी , मी दुत तुमचा पाहीला
हातचे टाकून आलो , मी स्वार्थ नाही पाहिला
दोष ना देऊ जरी का आहेस आम्हा विसरलास
देवेंद्रही नादात ह्यांच्या इमान आहे विसरला
अप्सरांना त्याच आम्ही,आदाब केला शेवटी
मृत्युवरही हाय माझ्या, त्यांचीच सत्ता शेवटी

– भाऊसाहेब पाटणकर

ईश्क सारा विसरलो


खेळलो इश्कात जैसे ,बेधंद आम्ही लोळलो
लोळलो मस्तीत , नाही पायी कोणाच्या लोळलो
अस्मिता इश्कात सा~या केव्हाच नाही विसरलो
आली तशीही वेळ तेव्हा, ईश्क सारा विसरलो
दोस्तहो,हा ईश्क काही एसा करावा लागतो
ऎसे नव्हे,काही येथे,नुसता जिव द्यावा लागतो
वाटते, नागीण ज्याला खेळण्या साक्षात हवी
त्याने करावा ईश्क येथे, छाती हवी ,मस्ती हवी
इश्कातही मागे कुणाच्या,धावलो नाही कधी
सोसले सारे जैसे ,काहीच ना झाले कधी

– भाऊसाहेब पाटणकर

जयहिंद आणि जयजवान


ऐसे नव्हे की भारती या बुद्ध नुसता जन्मला
नुसताच नाही बुद्ध येथे आहे शिवाजी जन्मला

विरतेची भारती या ना कमी झाली कधी
आमचा इतिहास नुसता इतिहास ना झाला कधी

तीच आहे हौस आम्हा व्हावया समरी शहीद
बाजी प्रभूही आज आहे आज तो अब्दुल हमीद

बोलला इतुकेच अंती आगे बढो आगे बढो
देउन गेला मंत्र जसा आगे बढो आगे बढो

धर्माहुनी श्रेश्ठ आप्ल्या देशास जो या समजला
मानु आम्ही त्यालाच आहे धर्म काही समजला

जन्मला जो जो इथे तो विर आहे जन्मला
अध्यात्म ही या भारताच्या युद्धात आहे जन्मला

कुठला अरे हा पाक याचे नावही नव्हते कुठे
कळणारही नाही म्हणावे होता कुठे गेला कुठे

हे म्हणे लढणार यांच्या दाढ्या मिश्या नुसत्या बघा
पाहिली नसतिल जर का बुजगावणी यांना बघा

पाहण्याला सैन्य त्यांचे जेव्हा आम्ही गेलो तिथे
नव्हते कोणीच होते फ़क्त पैजामे तिथे

आहे ध्वजा नक्कीच आमुची पिंडीवरी लहरायची
फ़क्त आहे देर त्यांनी समरी पुन्हा उतरायची

हाच आहे ध्यास आता अन्य ना बोलू आम्ही
बोलु आम्ही जयहिंद आणि जयजवान बोलू आम्ही

– भाऊसाहेब पाटणकर

भाऊसाहेब पाटणकर


1. मिलन
“जन्मलो तेव्हाच होते, लग्न अमुचे लागले
पहिले होते तिने मज, मिच नव्हते पहिले
समय माझ्या मिलनाचा, होति उभ मोजित ति
आज भॅटॅ मोत अम्हा, जैसे शिवाला पार्वति”
————

2. दुनिया तुला विसरेल!

नुसतेच ना दुनियेत तुमच्या, आलो अम्ही गेलो अम्ही
भगवन तुझ्या दुनियेस काही, देऊनी गेलो अम्ही
शायरी तुला अर्पून गेलो, माझे सर्वस्व ती
दुनिया तुला विसरेल भगवन, ना अम्हा विसरेल ती
————
3. पडदा
कुठवरि सोसावयाच्या यातना तुज पाहुनि,
वाटते कि ठिक होति चाल पडदयाचि जुनि

– भाऊसाहेब पाटणकर

नाही बरे


अपुल्याच हाती, ओठ अपुला चावणे नाही बरे
हक्क अमुचा आमुच्या समोरी मारणे नाही बरे

कुंतलांना सांग तव जे धावले गालावरी,
दुर्बलांनी रक्षिले का होते कोणा केव्हातरी?

इतुक्याच साठी लाविला ना हात मी तनुला तिच्या
भोगायची मज फक्त होती लाज गालीची तिच्या

भ्रमरापरी सौंदर्यवेडे आहो जरी ऐसे आम्ही,
नाही कुठे प्रेमात भिक्षुकी केली आम्ही

– भाऊसाहेब पाटणकर