सकाळी उजाडता उजाडता


सकाळी उजाडता उजाडता उठले, पाहिलं
….. आणि कमालच!
एक वीट निखळलेली.
मी उचलून लावली ती जिथल्या तिथे.
पुन्हा चार दिवसांनी
पूर्वा लाल व्हायच्या आधीच उठले, पाहिलं,
तर अर्ध्याअधिक विटा उचकटून फेकलेल्या !
पुन्हा माझी कारागिरी!
पुन्हा काही दिवसांनी Continue reading

Advertisements

लेणी


समोर, धुकं पांघरुन,
कोवळं ऊन खात बसलेला हा लोहगड
रोज पहातो माझ्याकडे रोखून,
आणि नजरेनंच विचारतो, विसरलीस ?
आपणच उत्तर देतो, हो विसरणारच.
मी पुटपुटते, दगड शुद्‍ध दगड !
असं सगळं विसरता येत असतं, Continue reading

आठवणी


मनात आठवणी गर्दी करतात तेव्हा
ह्सतमुखानं त्यांना या म्हणावं;
ऊंची, मखमली, आसनं देऊन
प्रेमानं बसा म्हणावं;
स्थानापन्न झाल्या की हळूच विचारावं,
काय घेणार ?
त्याही बेट्या मिस्कील ;
निष्पाप बालपणाचा आव आणून विचारतील, Continue reading

जाणीव


अशी जाणीव झाली की
डोळे वळतात आत;
आतला सगळा गोंधळ पाहून
होतात अचंबित.
अहंची रानटी रोपटी,
बिनओळखीची पाळंमुळं,
झणाणणार्‍या वीणाबिणा,
एकदोन पक्षी आभाळखुळे.

— पण खुज्या खुज्या सृष्टीतसुद्‍धा Continue reading

पाठीशी कृष्ण हवा !


मौनानं ही होतं एवढं रामायण
हे माहीत असतं तर
शब्दांच्याच स्वाधीन झाले असते ;
पण शब्दांनी नेली असती मिरवणूक Continue reading

वाटा


हरवलेल्या वाटा….
चुकलेल्या वाटा….
रुळलेल्या वाटा….
पहिली धरते एक हात;
दुसरी धरते दुसरा;
पाय ओढून तिसरी म्हणते
आता इथेच पसरा !

– पद्मा गोळे Continue reading

चाफ्याच्या झाडा ….


चाफ्याच्या झाडा ….
का बरे आलास आज स्वप्नात?
तेव्हाच तर आपले नव्हते का ठरले?
दु: ख नाही उरलं आता मनात
फुलांचा पांढरा, पानांचा हिरवा
रंग तुझा रंगतोय माझ्या मनात
केसात राखडी पण पायात फुगडी
मी वेडी भाबडी तुझ्या मनात
चाफ्याच्या झाडा …. Continue reading