निर्माल्य


मी रात्रीचं एक पाहून ठेवलंय-
– ती होता होता बायको ओरडते
– मध्यरात्री कुत्री ओरडतात
– पहाटे पहाटे कोकिळा ओरडते
– आणि उजाडता उजाडता दूधवाला ओरडतो…….

मी रात्रीचं एक पाहून ठेवलंय-
– ती होता होता कविता आठवते Continue reading

Advertisements

झोप


झोप घेतायत सारे…झोप घेतायत…

बायको…मुलगी…नातवंडं…पतवंडं…
विझल्या दिव्यातील निद्रिस्त अंधारातून,
काळोखाच्या तळाशी
अंधारल्या खोल्यांतून…माजघरातून…
झोप घेतायत सारे…झोप घेतायत…

स्ट्रॉमधून कोल्ड्रिंक शोषून घ्यावं
तसे खोल श्वासातून झोप ओढून घेतायत कणाकणांतून…
मिटक्या मारतायत…!
कसलंच भान नसल्याचं किती उत्तान समाधान Continue reading

बोलतो ते


बोलतो ते चूक आहे की बरोबर?
मी बरोबर वा खरोखर ती बरोबर?

काय डोळ्यांतून माझ्या दोष आहे ?
कोणताही रंग का नाही बरोबर? Continue reading

तोल का जातो?


सावरावे रोज तरीही तोल का जातो?
कोणत्या तार्‍याकडे हा काफिला जातो?

उतरते रात्रीत अर्ध्या कोण स्वप्नांशी? Continue reading

संधी …


मी काळाला एक संधी देतो आहे
आणि स्वत:ला एक संधी मागतो आहे
तुझ्याविषयी मनात निखळ चांगले काही मागे उरण्यासाठी…!
पाऊस तर आटोपून गेलाय केव्हाच आपला कारभार
आता हिरवळीवर फुलून आलेल्या
रंगबिरंगी रानफुलांची चित्र राहतील मनावर
का राहील हिरवलीखालचा ओलाकिच्च चिखल
हे मी काळावरच सोपवतो आहे… Continue reading

कल्पना…


या जगण्याच्या जंजाळातुन
कधी कल्पना जाते स्पर्शुन,
कि हा चंद्रम येत बहरून
झोपेच्या दुलईतून ओढून
हट्ट मांडते ती नाजुकसा,
आणि क्षणांचा फुटे आरसा !
त्या बेभानी विलयानंतर
शमवित श्वासांमधली थरथर Continue reading

जरी


मी जन्मांचे राग जरीही मनात साठवतो
आयुष्याच्या पायापाशी नम्रपणे बसतो

जे जे माझे ते जपण्यास्तव ‘रोख’ ठोक बनतो
जे ना माझे ते स्वनांशी उधार मागवतो ! Continue reading