थांबू नकोस – ना.धों.महानोर


झाकड पडली, थांबू नकोस
ओझं होईस्तोवर कवळाचा भारा बांधू नकोस
आधीच तर तू सकवार फ़ार
चिटपाखराच्याही नजरेत भरशील अशी
त्यात,
या जांभळ्या लुगड्याने तू अशी दिसतेस
मोहाच्याही झाडाला मोह व्हावा. आणि या पांदीत
तुला लुबाडावं . अगदी तुझ्या सर्वस्वासकट.
बघ ना, काळोख कसा झिंगत येतोय,
तुला या काळोखात कवळून घ्यायला
थांबू नकोस!

– ना. धों. महानोर

Advertisements

मी रात टाकली, मी कात टाकली


[slider title=”मी रात टाकली – Click Here”]
[ad]

मी रात टाकली, मी कात टाकली
मी मुडक्या संसाराची बाई लाज टाकली

हिरव्या पानांत, हिरव्या पानांत
चावंळ चावंळ चालती
भर ज्वानीतली नार
अंग मोडीत चालती

ह्या पंखांवरती, मी नभ पांघरती
मी मुक्त मोरनी बाई, चांदन्यात न्हाती

अंगात माझिया भिनलाय ढोलिया
मी भिंगरभिवरी त्याची गो माल्हन झाली
मी बाजिंदी, मनमानी, बाई फुलांत न्हाली

गीत – ना. धों. महानोर
संगीत – पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर – लता मंगेशकर, रवींद्र साठे, चंद्रकांत काळे
चित्रपट – जैत रे जैत (१९७७)

[/slider]

नभं उतरू आलं


नभं उतरू आलं, चिंब थरथर वलं
अंग झिम्माड झालं, हिरव्या बहरात

अशा वलंस राती, गळा शपथा येती
साता जल्मांची प्रीती, सरंल दिनरात

वल्या पान्यात पारा, एक गगन धरा
तसा तुझा उबारा, सोडून रीतभात

नगं लागंट बोलू, उभं आभाळ झेलू
गाठ बांधला शालू, तुझ्याच पदरा

गायक / गायिका : आशा भोसले
संगीतकार : हृदयनाथ मंगेशकर
गीतकार : ना.धो.महानोर
चित्रपट : जैत रे जैत

आज उदास उदास दूर पांगल्या साउल्या


आज उदास उदास दूर पांगल्या साउल्या
एकांताच्या पारावर हिरमुसल्या डहाळ्या

काही केल्या करमनां, कसा जीवच लागंना
बोलघेवडी साळुंकी, कसा शब्द ही बोलंना
असा रुतला पुढ्यात भाव मुका जीवघेणा

चांदण्याची ही रात, रात जळे सुनी सुनी
निळ्या आसमानी तळ्यांत लाख रूसल्या ग गवळणी
दूर लांबल्या वाटेला रूखी रूखी टेहाळणी
दूर गेले घरधनी बाई, दूर गेले धनी

[slider title=”अधिक माहिती”]

अधिक माहिती

गायक/गायिका: लता मंगेशकर
संगीतकार: पं. हृदयनाथ मंगेशकर
गीतकार: ना. धों. महानोर[/slider]

मी गाताना गीत तुला लडिवाळा


मी गाताना गीत तुला लडिवाळा
हा कंठ दाटुनी आला

मी दुःखाच्या बांधुनी पदरी गाठी
जपले तुज ओटी-पोटी
कधी डोळ्यांना काजळ तूज भरताना
गलबला जीव होताना

खोप्यात जिथे चिमणी रोज पिलांना
सांगते गोष्ट नीजताना
ते ऐकुनी का मन तडफड होई
पाळणा म्हणे अंगाई

आयुष्याला नको सावली काळी
इश्वरा तूच सांभाळी
झुलता झोका जावो आकाशाला
धरतीचा टिळा भाळाला

गीत – ना. धों. महानोर
संगीत – आनंद मोडक
स्वर – रवींद्र साठे
चित्रपट – एक होता विदूषक (१९९२)

गोऱ्या देहावरती कांति, नागीणीची कात


गोऱ्या देहावरती कांति, नागीणीची कात
येडे झालो आम्ही ज्यावी, एक दिसं रात
तुझ्या रूपाचं बाशिंग डोल्यात
तुझ्यावाचून सुन्नाट दिनरात

असा बोल बोलती जग पंखात घेती
असं एखादं पाखरू वेल्हाळ
ज्याच्या भांगात बिंदिचा गुल्लाल

काल्या एकल्या राती मन मोडून जाती
असं एखादं पाखरू वेल्हळ
ज्याला सामोरं येतया आभाळ

याला काय लेवू लणं, मोतीपवळ्याचं रान ?
राती चांदण्या रानात शिणगार
सारी दौलत जरीच्या पदरात

– ना. धों. महानोर

राजसा जवळी जरा बसा


राजसा…
जवळी जरा बसा
जीव हा पिसा
तुम्हावीण बाई
कोणता करू शिणगार
सांगा तरी काही.
त्या दिशी करुन दिला विडा
टिचला माझा चुडा
कहर भलताच
भलताच रंगला कात
लाल ओठात.
राजसा
जवळी जरा बसा….
ह्या तुम्ही शिकविल्या खुणा
सख्या सजणा
देह सटवार
सोसता न येइल अशी
दिली अंगार.
राजसा
जवळी जरा बसा….
मी ज्वार नवतीचा भार
अंग जरतार ऐन हुरड्यात
तुम्ही नका जाऊ साजणा
हिवाळी रात.
राजसा
जवळी जरा बसा….

– ना.धों.महानोर