नाही सोडणार साथ…!


Dilip Charthankar

 

नगं ईकू डोरल्याले
नगं पुरणं साजूक |
धनी काजळला रानी
लई येळ ही नाजूक ||

आली अवदसा देवा
भेगा फाकल्या रानात |
खचू नगं मह्या धन्या
नगं करपू मनात || Continue reading

Advertisements

मनातला मोर


मनातला मोर / मनातला मोर //
मोर होता जगत आयुष्य संथ /
उत्तम सुरु होता त्याचा प्रपंच पंथ //१//

मनातला मोर / मनातला मोर //
मोर होता धावत डोंगर पार करत दूर /
तुझ्यामुळे सापडले त्याला ताल आणि सूर //२// Continue reading

क्षणात


सुजित,
तुझा म.क.सं. संकेतस्थळ पाहिलं… रोज वाचतही असतो…
मराठी कवितेंसाठीचं हे तुझ काम खुपच आश्वासक अणि नव्या कवींना उर्मी देणारं आहे..
खुप खुप धन्यवाद अणि अभिनंदन…
हे संकेतस्थळ एवढं देखणं आहे की माझ्या काही कविता इथे असाव्यात असा मोह होतो आहे.
त्यासाठीसुध्दा हा पत्रप्रपंच…!! एक कविता सोबत देत आहे. आवडल्यास नक्की कळविणे.

क्षणात होते जांभ गुलाली
क्षणात सांज का लाल दिसे
क्षणात दाटे अबीर भोवती
क्षणात चांदणपूर असे Continue reading

प्रिय सर्दीस


मनस्वी

मूळ कवीची माफी मागून…

प्रिय सर्दीस,

.columns {
-moz-column-count: 2;
-webkit-column-count: 2;
}

असतेस सोबत तू जेव्हा
नाक गळके गळके होते
रुमालांचेचे भिजती तागे
डोके जडशीळ होते

नभ फाटून वीज पडावी
कल्लोळ तसा ओढवतो
ही शिंक दिशाहीन होते
अन्‌ मग फवारा उडतो Continue reading

वसंत ही निष्पर्ण आता


वसंत ही निष्पर्ण आता जाताच तू जीवनातूनी
शिशिराचे ते भोगच आता आले माझ्या नशिबातही
कशी करावी रुजवण कळेना तुझ्यावाचूनी जगण्याची
कातरवेळी दाटून येते आठव आपुल्या स्वप्नांची ! Continue reading

आसवांनी आज माझ्याShare on Facebook

आसवांनी आज माझ्या का असे हे बंड केले
भावनांचे कल्लोळ सारे पापण्यांनी कैद केले !
पाळले मीच होते पदरात माझ्या साप सारे
पोसले रक्तावरी जे डंख त्यांचे जहर झाले ! Continue reading

भोगShare on Facebook

काहीही नसताना हाती
आले हे कसले भोग माझ्या माथी

खायला अन्न नाही
प्यायला पाणी नाही
राहायला घर नाही
घालायला कपडे नाही Continue reading