दंगलीच्या कविता


अखेरीला
माणसांनीच पेटवले
माणसांचे गाव
ही कविता
कुणासाठी?

माणसांनी
दार बंद करून
प्रेतं पहायचं सपशेल नाकारलं
शांतताप्रेमी नागरिक म्हणून
आपण त्यांची नोंद करायची का? Continue reading

Advertisements

वेलकम न्यू मिलेनियम


वेलकम! न्यू मिलेनियम वेलकम !

संपल्या दोन सहस्त्रकांचेही

आम्ही असेच केले होते स्वागत

की संपेल त्यांचे सोबत

आमचेही एखादे तरी दु:ख म्हणुन

केवळ सहस्त्रके संपली

डोन्ट वरी!

अजुनही फास घेण्यापुरते का होईना Continue reading

चेहरा


त्या माणसाला चेहराच नव्हता!

अचानक पण एक आश्चर्य घडलं
बिनचेहऱ्याचा तो माणुस मैफिलित
गाणं ऐकु लागला
तेंव्हा त्याला चेहरा आला

त्याचे डोळे, त्याचे ओठ
गाण्याला दाद देउ लागले,
गाण्याला दाद देता देता
त्याचा चेहरा उजळला! Continue reading

तू नसशील


अंगणभर विखुरलेल्या गुलमोहोराच्या लालजर्द
पाकळ्यांतून हलकेच पावलं टाकतानाही
तुला कसेसे होई
पहिल्या पावसाच्या धुंद वृष्टीत सचैल भिजताना
तुझ्या नसानसातून आनंदाचे हुंकार उमटत
दूरदूरुन आलेल्या गीतलहरींनी तुझ्या
छातीतले इमानी दु:ख भरभरुन वाहू लागे.
एकदा सोनेरी संधीप्रकाशात झळ्झळती केतकी Continue reading

प्रतिक्षा


असह्य उकाडा हिदेखील
तुझ्या येण्याचीच खूण
असं कळल्यापासून
त्याचीही प्रतीक्षाच आहे

तू आलास की धुडगुस
विस्कटणं ठरलेलं
तरी प्रतिक्षा संपत नाही Continue reading

एक हुंदका


कसे न तेव्हा कळ्ले काही
की तो होता आवच सार
अनुभुतीच्या आधाराविण
पोकळ नुसता शब्दपसारा !

नव्हती झाडे, नव्हत्या फांद्या
मातीमधली मुळेहि नव्हती,
तरारलेल्या ताठ तुर्‍यांचा
डौल तेवढा होता वरती ! Continue reading