हिशोब सांगते ऐका, भावजी कसा खरचला पैका !


अगं रानी थांब मर्दिनी त्वांड फिरवुनी जाऊ नको ग
अंगत पंगत सांगतो गंमत मारक्या म्हशीगत बघु नको ग
अगं माझ्या रानी गं …

अहो सरकार स्वारी आली दारी तुकडा वोवाळुन टाकू का रं
अन्‌ उजेड पडलाय्‌ तुमचा म्हणुनी या सुर्व्याला झाकन झाकू का रं
अरं माझ्या राजा हे … Continue reading

Advertisements

आकाशी झेप घे रे, पाखरा


आकाशी झेप घे रे, पाखरा
सोडी सोन्याचा पिंजरा

तुजभवती वैभव, माया
फळ रसाळ मिळते खाया
सुखलोलुप झाली काया
हा कुठवर वेड्या, घेसी आसरा

घर कसले ही तर कारा
विषसमान मोती चारा
मोहाचे बंधन द्वारा
तुज आडवितो हा कैसा, उंबरा

[slider title=”अधिक माहिती”]

अधिक माहिती

गायक/गायिका: आशा भोसले

गीत – जगदीश खेबूडकर

संगीत – सुधीर फडके

स्वर – सुधीर फडके

चित्रपट – आराम हराम आहे

वर्ष: १९७६

राग – यमन, तिलककामोद, देस (नादवेध)

[/slider]

तुज पंख दिले देवाने
कर विहार सामर्थ्याने
दरि, डोंगर, हिरवी राने
जा ओलांडुन या सरिता, सागरा

कष्टाविण फळ ना मिळते
तुज कळते, परि, ना वळते
हृदयात व्यथा ही जळते
का जीव बिचारा होई बावरा

घामातुन मोती फुलले
श्रमदेव घरी अवतरले
घर प्रसन्नतेने नटले
हा योग जीवनी आला, साजिरा

– जगदीश खेबूडकर

ऐरणिच्या देवा तुला, ठिणगि ठिणगि वाहु दे


ऐरणिच्या देवा तुला, ठिणगि ठिणगि वाहु दे
आभाळागत माया तुजी, आम्हांवरी ऱ्हाउ दे

लेउ लेनं गरीबीचं, चनं खाऊ लोकंडाचं
जीनं व्होवं अबरुचं, धनी मातुर, माजा देवा, वाघावानी असू दे Continue reading

सख्या रे, घायाळ मी हरिणी


हा महाल कसला रानझाडि ही दाट
अंधार रातिचा, कुठं दिसंना वाट
कुण्या द्वाडानं घातला घाव
केलि कशी करणी ?
सख्या रे, घायाळ मी हरिणी

काजळकाळी गर्द रात अन्‌ कंप कंप अंगात
सळसळणाऱ्या पानांनाही रातकिड्यांची साथ
कुठं लपू मी, कशी लपू मी, गेले भांबावुनी Continue reading