पुन्हा वाटते की तुला गुणगुणावे


पुन्हा वाटते की तुला गुणगुणावे
तुला गुणगुणाया तुझे ओठ व्हावे…..

दिले कोवळे स्वप्न मी जीवनाला
तुझे स्वप्न माझ्या उशाला असावे……

तुझी याद आली अवेळी अशी ही
जसे चांदण्याने दुपारीच यावे……

आता लावला हा खरा चेहरा मी
आता माणसांनी मला ओळखावे……

– चंद्रशेखर सानेकर

Advertisements