मर्म


ज्याचे त्याने घ्यावे

ओंजळीत पाणी

कुणासाठी कोणी

थांबू नये!

…असे उणे नभ

ज्यात तुझा धर्म

माझे मीही मर्म

स्पर्शू नये

– चंद्रमाधवीचे प्रदेश, ग्रेस
Advertisements

शब्दांनी हरवुन जावे


मुळ कवितेचे नाव “निष्पर्ण तरुंची राई” असे असून, ही कविता कवी ग्रेस यांच्या”चंद्रमाधवीचे प्रदेश” या काव्य संग्रहात आहे. मुळ कवितेत एकुण ७ कडवे आहेत (ध्रुवपद वगळता). ——————
शब्दांनी हरवुनी जावे , क्षितिजांची मिट्ता ओळ,
मी सांज फुलांची वेळ, व्रुक्षांच्या कलत्या छाया
पाण्यावर चन्द्र फुलांची, मी निळीसावळी वेल.
गात्रांचे शिल्प निराळे, स्पर्शाचा तुट्ला गजरा,
मी गतजन्मीची भुल, तु बावरलेला वारा,
पायात धुळिचे लोळ, मी भातुकलिचा खेळ
त्या वेली नाजुक भोळ्या वाऱ्याला हसवुन पळती
क्षितिजांचे तोरण घेउन दारावर आली भरती ॥२॥

देऊळ पलिकडे तरिही तुज ओंजळ फुटला खांब
थरथरत्या बुबुळांपाशी मी उरलासुरला थेंब ॥४॥

संध्येतिल कमळासम मी नटलो शृंगाराने
देहाच्याभवती रिंगण घालती निळाइत पाने ॥५॥

ते धुके अवेळी होते की परतायाची घाई
मेंदूतुन ढळली माझ्या निष्पर्ण तरुंची राई ॥७॥

– चंद्रमाधवीचे प्रदेश, ग्रेस

भय इथले संपत नाही…..ग्रेस


मुळ कवितेचे नाव “निष्पर्ण तरुंची राई” असे असून, ही कविता कवी ग्रेस यांच्या”चंद्रमाधवीचे प्रदेश” या काव्य संग्रहात आहे. मुळ कवितेत एकुण ७ कडवे आहेत (ध्रुवपद वगळता).

भय इथले संपत नाही मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो तू मला शिकविली गीते

ते झरे चंद्रसजणांचे ती धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण झाडांत पुन्हा उगवाया Continue reading