चर्च


धुक्यात हरवलेल्या संध्याकाळी
चर्चच्या घंटा वाजतात
हळुच भविष्याची कवाडे उलगडतात
खिन्नतेची बासरी वाजवत….

मनाची हुरहुर शिगेला पोहचते
पवित्र घंटानादात हरवते, Continue reading

पाऊस



Share on Facebook

पाऊस
देवळाजवळचा ;
पाराजवळचा
पाऊस.
देवळापलीकडचा
परापलीकडचा
पाऊस
सर्व
Continue reading

पांढर्‍या शुभ्र हत्तींचा


पांढर्‍या शुभ्र हत्तींचा , रानातून कळप निघाला
संपूर्ण गर्द शोकाच्या गर्तेतही मिसळून गेला

त्या गुढ उतरत्या मशिदी , पक्ष्यांनी गजबजलेल्या
कल्लोळ पिसांचा उडत्या पंखात लपेटुन बुडाल्या Continue reading

उखाणे


ओळखीच्या वार्‍या
तुझे घर कुठे सांग?
गरूडाच्या पंखामध्ये
डोंगरांची रांग

निळे निर्झरिणी
अगे सारणीचे राणी
खडकाच्या डोळ्यालाही
येते कसे पाणी?

जाईबाई सांगा
तुम्ही मनातले पाप
कळ्यांचीही फुले
कशी आपोआप? Continue reading

या हाताने स्तन गोंदून घे


या हाताने स्तन गोंदून घे
लाव मंदिरी दिवा
फूल होऊनी अंधाराचे
गळून पडे काजवा Continue reading

राधेस जो मिळाला तो एकटाच उरला!


स्वर्गातून आणलेला प्राजक्त सत्यभामेने
एकदा असाच बळजोरीने
आपल्या अंगणात लावून घेतला
जीवाला आलेलं पांगळेपण
हव्यासपूर्तीच्या कुबडीने सावरण्यासाठी Continue reading

पाठीवर बाहुलीच्या


पाठीवर बाहुलीच्या
चांदणीचा शर
गोर्या मुलीसाठी आला
काळा घोडेस्वार …..

प्राक्तनाच्या घळीमध्ये
पावसाचे पाणी
अंधारात घोड्यालाही
ओळखले कोणी?

पुरूषाच्या पुढे आली
हिला चढे माज
चार बाया मिळूनिया
काढा हिची लाज

न्हाऊनीया केस ओले
दारामंदी आली
खुंटीवर टांगलेली
चोळी चोरी गेली

जोडव्याच्या जोडालाही
डोह घाली धाक
कुंकवाच्या करंड्यात
बाभळीची राख

पाठीमागे उभा त्याचे
दिसेल का रूप?
आरशाच्या शापानेही
आलिंगन पाप

रानझरा ओळखीचा
तहानेची बोली
कात टाकलेला साप
पाचोळ्याच्या खाली

– ग्रेस