तू बुद्धि दे तू तेज दे


तू बुद्धि दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे
जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे

हरवले आभाळ ज्यांचे हो तयांचा सोबती
सापडेना वाट ज्यांना हो तयांचा सारथी
साधना करिती तुझी जे नित्य तव सहवास दे Continue reading

Advertisements

कातरवेळी बसलो होतो


कातरवेळी बसलो होतो
आठवणींचा पिंजत कापूस
तशात पाउस…..

ठुसठुसणारे घाव पुराणे
वीस्कटलेले डाव पुराणे
अन पुराणे काही उखाणे
सुटता झालो उगाच भावुक Continue reading

छिन्न मुखवटा लोकशाहीचा


साठी उलटली स्वतंत्र्याची ग्लोबल झाला देश
छिन्न मुखवटा लोकशाहीचा विस्कटला गणवेश

केवळ टोप्या आणिक झेंडे गहाण डोकी सारी
ठेचुनिया पुरुषार्थ ओणवी अभिलाषेच्या दारी Continue reading

नवरी आली


गो-या गो-या गालांवरी चढली लाजंची लाली गं पोरी नवरी आली
सनईच्या सुरांमंदी चौघडा बोलतो दारी गं पोरी नवरी आली
सजणी मैत्रीणी जमल्या अंगणी
चढली तोरणं मांडवदारी Continue reading

हे राजे जी रं जी रं


हे राजे जी रं जी रं जी राजे हे जी जी
हे राजे जी रं जी रं जी राजे हे जी जी

झटकून टाक ती राख, नव्याने जाग, पेटू दे आग मराठी आता
डोळ्यांत फुटे अंगार भगवा, रक्तात जागू दे आज भवानी माता
हे राजे जी रं जी रं जी राजे हे जी जी
हे राजे जी रं जी रं जी राजे हे जी जी Continue reading

पाचुच्या रानात


पाचुच्या रानात झिम्मड पाऊस उनाड अल्लड वारा
नारळी पोफळी शिरल्या आभाळी वाळूत चांदणचुरा

पिवळी पिवळी
बिट्ट्याची काचोळी
नेसल्या डोंगर वाटा
माळून गजरे Continue reading

तू गेल्यावर


आठवणींचा धसका आणिक भय स्वप्नांचे
तू गेल्यावर नको वाटते जग स्वप्नांचे

चिंब भिजावे मनी वाटते शहारतो मी
व्याकूळ होऊन मेघ सावळे चितारतो मी Continue reading