आजही नाहीच त्या दारात रांगोळीआजही नाहीच त्या दारात रांगोळी
आजही येतील ओठी खिन्नश्या ओळी

रोग अस्ताव्यस्त होण्याचा बरा झाला
बांध आता जीवना तू आपली मोळी Continue reading

लळा लावते


गुदमरतो मी, कोणी इतका लळा लावते
अन कोणी गुदमरण्याला सापळा लावते

प्रेमाचाही सूर कुणाचा चुकतो येथे
कुणी विराणी गातानाही गळा लावते Continue reading

मी नाही !


जिवंत कोण? कुणालाच बातमी नाही
दिसे हरेक तरी.. सावली हमी नाही

किती धुवाल तुम्ही रक्त शेवटी अमुचे
पचेल खून असा रंग मोसमी नाही Continue reading

दंश


येणारा दिवस मला हेटाळत हसणारच
जाणारा दिवस मला जाताना डसणारच

वरवरच्या बोलण्यात गेली बघ रात्र सरून
मावळता चंद्र तुझे नाव मला पुसणारच Continue reading

मी किनारे सरकताना पाहिले


मी किनारे सरकताना पाहिले
मी मला आक्रंदताना पाहिले……

कोणती जादू अशी केलीस तू
मी धुके गंधाळताना पाहिले……
पाकळ्या खंतावूनी जेव्हा गळाल्या
मी फुलांना झिंगताना पाहिले……
लोक ते मागे फिराया लागले
मी तुला रेंगाळताना पाहिले……

– नीता भिसे

ऐन वेळी जरी मोगरा टाळतो


ऐन वेळी जरी मोगरा टाळतो
तू मला माळशी,मी तुला माळतो……

सावरू ही नका आसवांनो मला
मीच माझे आता दुःख सांभाळतो…… Continue reading

तू माझा स्वर तू माझी लय


तू माझा स्वर तू माझी लय
तू माझ्या गीतांचा आशय…..

पावसात ही लगबग कसली
तोल तुझा जाण्याचे हे वय……

दुनिये तू जिंकलीस कोठे
मी केला माझाच पराजय……

ये मरणा,येरे ये मरणा
मज वाटे ह्या जगण्याचे भय……

– प्रदीप निफाडकर