पिढयापिढयांच्या निर्भय आम्ही


पिढयापिढयांच्या निर्भय आम्ही, भारतीय भगिनी

घराघरांचे दुर्ग झुंजवू, झुंजू समरांगणी ॥धृ०॥

अष्‍टभुजेच्या वंशज आम्ही, महिषासुर मारु

देवत्वाच्या गुढया उभारु, दानव संहारु

वलय होउनी वज्र नांदते, आमुच्या कर कंकणी ॥१॥ Continue reading

Advertisements

ये थोरवी श्रमासी


हाती धरुन झाडू, तू मार्ग झाडलासी

स्पर्शे तुझ्या महात्म्या, ये थोरवी श्रमासी

तण उच्चनीचतेचे, निपटून काढिले तू

तट धर्मकल्पनांचे, उलथून पाडिले तू Continue reading

अल्लड माझी प्रीत


अल्लड माझी प्रीत, तिला ना रीत जगाची ठावे
आवडेल तो मित्र करावा त्याच्यासंगे गावे

अशी असावी सांज साजिरी, असा असावा वारा
एक सवंगडी संगे यावा छेडित छेडित तारा
सूर पहाडी, बोल रांगडे मुखात माझ्या यावे Continue reading

Advertisements

बालगीत एका तळ्यात होती, बदके पिले सुरेख


एका तळ्यात होती बदके पिले सुरेख

होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक

कोणी न तयास घेई खेळावयास संगे

सर्वांहुनी निराळे ते वेगळे तरंगे

दावूनि बोट त्याला, म्हणती हसून लोक Continue reading

Advertisements

दूद नको पाज्यू हलीला….- बोबडा बलराम:


बोबडा बलराम:

दूद नको पाज्यू हलीला काल्या कपिलेचे
काला या मनती आइ ग, पोल गुलाक्याचे

तूच घेउनी पगलाखाली
पाजत जा या शांज-शकाली
तुजियाशम गोले, होउदे लूप शोनूल्याचे

तूही गोली, मीही गोला
काला का हा किशन् एकला?
लावु नको तित्ती, नको ग बोत काजलाचे

थेउ नको ग याच्यापाशी
वाल्यामधल्या काल्या दाशी
देउ नका याला, नहाया पानी यमुनेचे

पालनयात तू याच्या घाली
फुले गोजिली चाप्यवलली
लावित जा अंगा, पांधले गंद चंदनाचे

नकोश निजवू या अंधाली
दिवे थेव ग उशास लात्ली
दावु नको याला कधीही खेल शावल्यांचे

नको दाखवू, नको बोलवू
झालावलचे काले काउ
हंश याश दावी, शाजिले धवल्या पंखांचे

हंशाशंगे याश खेलुदे
चांदाशंगे गोथ्थ बोलुदे
ल्हाउ देत भवती, थवेही गौल-गौलनींचे

मथुलेहुन तु आन चिताली
गोली कल ही मूल्ती काली
हशशी का बाई, कलेना कालन हशन्याचे ?

– गदिमा

Advertisements

एक आस मज एक विसावा


हे श्रीरामा, हे श्रीरामा
एक आस मज एक विसावा
एकवार तरी राम दिसावा, राम दिसावा

मनात सलते जुनी आठवण
दिसतो नयना मरता श्रावण
पिता तयाचा दुबळा ब्राम्हण
शाप तयाचा पाश होऊनी, आवळीतो जिवा Continue reading

Advertisements

सावळांच रंग तुझा


सावळांच रंग तुझा, पावसाळी नभापरी
आणि नजरेत तुझ्या, वीज खेळते नाचरी ॥ ध्रु ॥

सावळांच रंग तुझा, चंदनाच्या बनापरी
आणि नजरेत तुझ्या, नाग खेळती विखारी ॥ १ ॥

सावळांच रंग तुझा, गोकुळीच्या कॄष्णापरी
आणि नजरेत तुझ्या, नित्य नांदते पांवरी ॥ २ ॥

सावळांच रंग तुझा, माझ्या मनी झाकळतो
आणि नजरेचा चंद्र, पाहू केव्हा उगवतो ॥ ३ ॥

सावळाच रंग तुझा, करी जीवा बेचैन
आणि नजरेत तुझ्या, झालो गडे बंदिवान ॥ ४ ॥

[slider title=”अधिक माहिती”]

अधिक माहिती

गायक/गायिका:माणिक वर्मा
संगीतकार:सुधीर फडके
गीतकार:ग. दि. माडगूळकर[/slider]

Advertisements