कधी संपेल हा खटला


कधी संपेल हा खटला , कसे काही घडत नाही
परागंदाच कविता अन् कवीही सापडत नाही

किती असते जरी कोणी , कुणी नसतेच कोणाचे
मरण पाहून दर्याचे किनाराही रडत नाही
Continue reading

Advertisements

मुक्त्तकव्याकुळ माझ्या, नजरेला दे, नजर प्राशिण्यासाठी
तृषार्त माझ्या, अधराना दे, अधर प्राशिण्यासाठी
वसंतात तू, वसंतात मी, वसंत अवती भवती
मोहरलेल्या, वृक्षाला दे, बहर प्राशिण्यासाठी Continue reading

वगैरे


पुन्हा घेतली मी भरारी वगैरे
पुन्हा सज्ज झाले शिकारी वगैरे

खरा प्रश्न मी टाकलेलाच नाही
तुझी मात्र चर्या.. विचारी.. वगैरे

बिचारा खरोखर भिकारी निघाला
मला वाटले की पुढारी वगैरे

म्हणा तूच किंमत करावीस माझी ***
तुला शोभते सावकारी वगैरे….

कशाचीच आता नशा येत नाही
तसा घाव होतो.. जिव्हारी.. वगैरे Continue reading

जे जसे आहे तसे स्वीकारतो मी शेवटी…


बेगडी तेजाळुनी अंधारतो मी शेवटी
जे जसे आहे तसे स्वीकारतो मी शेवटी

खूपदा परिपक्वतेने वावरावे लागते Continue reading

हात होतो पुढे भिकार्‍यांचा


वीट आला जरी शिसार्‍यांचा
हात होतो पुढे भिकार्‍यांचा

होत नाहीत जे स्वतःचेही
कोण वाली अशा बिचार्‍यांचा Continue reading

कहाणी – 2


‘जो तो पळून जातो, ऐकुन ही कहाणी’ या मिसर्‍यावर तरही गझल लिहिण्याचा हा दुसरा प्रयत्न –

जो तो पळून जातो, ऐकुन ही कहाणी
सांगायची कितीदा रंगून ही कहाणी

खोटी सहानुभूती देतोस रे कशाला
तू एकदा पहा ना भोगून ही कहाणी Continue reading

तो बोलतो न काही


भारीच त्रास देतो तो बोलतो न काही
मौनास वीट येतो, तो बोलतो न काही
शब्दात प्रीत माझी सांडून वाहताना
डोळ्यास अर्थ देतो, तो बोलतो न काही Continue reading