मुक्त्तकव्याकुळ माझ्या, नजरेला दे, नजर प्राशिण्यासाठी
तृषार्त माझ्या, अधराना दे, अधर प्राशिण्यासाठी
वसंतात तू, वसंतात मी, वसंत अवती भवती
मोहरलेल्या, वृक्षाला दे, बहर प्राशिण्यासाठी Continue reading

Advertisements

मुंबई


वरून दिसते आम्रतरूसम मोहरली मुंबई
हाय! परंतू ऋतू जाणतो पोखरली मुंबई

पोटासाठी अनाथ अगतिक आला आश्रयाला
निवार्‍यास अंथरली त्याने पांघरली मुंबई Continue reading

सांजवेळी सोबतीला


सांजवेळी सोबतीला, सावली देऊन जा…
भैरवी गाईन मी, तू मारवा गाऊन जा…

मी जपोनी ठेविल्या, संवेदना स्पर्शातल्या,
त्या खुणांचे ताटवे, तू एकदा फुलवून जा… Continue reading

साधन मदिरा


व्यथा वेदना विसरायाचे साधन मदिरा
स्वतः स्वतःला फसवायाचे साधन मदिरा

गतकाळाच्या रंगमहाली मैफल सजते
भणंग स्वप्ने सजवायाचे साधन मदिरा Continue reading

मी नजरेला खास नेमले गस्त घालण्यासाठी


मी नजरेला खास नेमले गस्त घालण्यासाठी
तुला वाटले,ती भिरभिरते,तुला पहाण्यासाठी

म्हणून तू,जाहलीस माझी,माझी,केवळ माझी
किती बहाणे केले होते, तुला टाळण्यासाठी Continue reading

घर वाळूचे बांधायाचे


घर वाळूचे बांधायाचे
स्वप्न नसे हे दिवाण्याचे…

सहज बोलली,निघून गेली
झाले, गेले ,विसरायाचे…… Continue reading

तुझी वंचना, साधना, होत आहे


तुझी वंचना, साधना, होत आहे
तुलाही आता, वेदना, होत आहे

पुन्हा मेघ आलेत, आश्र्वासनांचे
पुन्हा एकदा, गर्जना, होत आहे Continue reading