हरिश्चंद्रगडावरच्या स्थानिक हॉटेलधारक मित्रांना आवाहन.


©ओंकार ओक

हरिश्चंद्रगडावरच्या स्थानिक हॉटेलधारक मित्रांना आवाहन.

महाराष्ट्र वनविभागाने गडावर दिवसेंदिवस वाढत चाललेल्या कचऱ्याची भीषण समस्या लक्षात घेऊन भावी काळापासून गडावर कॅम्पिंग व हॉटेल चालवण्यास बंदी घालण्याचा विचार कळवला आणि यामुळे अनुक्रमे गिर्यारोहक व स्थानिक हॉटेलधारक यांचं धाबं दणाणलं. स्थानिक हॉटेलधारक येणाऱ्या गिर्यारोहकांना त्यांच्या मोठ्या संख्येमुळे थर्माकोल किंवा प्लास्टिकच्या प्लेट्समधून खाद्यपदार्थ व चहा/ कॉफी देत असल्याने बेशिस्त पर्यटकांना आयतं कोलीत मिळालं आणि गडावर कचऱ्याचे ढिग दिसू लागले. गड कळसूबाई हरिश्चंद्र अभयारण्याच्या परिक्षेत्रात येत असल्याने व वनविभागाने हे सगळं थांबवण्यासाठी आत्तापार्यंत केलेल्या कंठशोषला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने त्यांच्याही संयमाचा कडेलोट झाला आणि अखेर वन्यजीव कायद्यांना अनुसरून ही कामगिरी करण्यात आली.
अजूनपर्यंत अधिकृत नोटीस न आल्याने गडावरची हॉटेल्स चालू आहेत. यानिमित्ताने भविष्यात हरिश्चंद्रगडाला या कचऱ्याच्या व बेशिस्त पर्यटनाच्या कलियुगातून मुक्ती मिळावी म्हणून सर्व हॉटेलधारक मित्रांना समस्त गिर्यारोहकांच्या वतीने हे आवाहन. आपला मित्र भास्कर बादडने या कार्याचा शुभारंभ केलाच आहे. इतर स्थानिक मित्रांना वनविभागाला सहकार्य करण्यासाठी हे आवाहन. ह्यामुळे ट्रेकर्सचा गडाकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होऊन वनविभागाच्या स्तुत्य उपक्रमाला हातभार लागून एक सुवर्णमध्य निघू शकतो.

  1. गडावर यापुढे (हॉटेल्स चालू ठेवण्याचा निर्णय वनविभागाने घेतल्यास) कोणत्याही परिस्थितीत थर्माकोलच्या प्लेट्स व प्लॅस्टिकचे ग्लास चहा/कॉफी साठी वापरणं ताबडतोब बंद करा आणि स्टीलच्या भांड्यांमध्ये जेवण पुरवण्यास सुरूवात करा. तुम्ही टेंट्ससाठी पाच सहा हजार सहज खर्च करू शकता तर तेच बजेट यासाठी वापरा.
  2. तुमच्याकडे जेवणाची ऑर्डर देण्यासाठी ग्रुप लिडरचा फोन आल्यास त्याला त्याच्यासकट सर्व सदस्यांना आपापले ताट,वाटी, चमचा व Mug आणायला सांगा व त्याची तयारी नसल्यास ती ऑर्डर घेऊ नका. गडाची विदारक अवस्था बघता धंदा महत्वाचा नसून गडावरील वातावरण सुरळीत होणं अत्यंत गरजेचं आहे.

  3. अनेकदा ग्रुपमध्ये काही लोक बॅचलर असतात किंवा वेगळ्या शहरात राहत असतात ज्यांच्याकडे हे घरगुती सामान मिळू शकत नाही. अश्या लोकांसाठी तुम्ही तुमची भांडी वापरल्यास त्यांच्याकडून त्याचं नाममात्र शुल्क घ्या आणि त्यांनाच ती भांडी स्वच्छ करायला सांगा.एका ग्रुपमागे फक्त दोन किंवा तीनच लोकांना तुमच्याकडून ताट वाट्या मिळतील असं स्पष्ट सांगा म्हणजे जो उठेल तो त्याच्यासाठी या सगळ्याची सोय तुम्हाला करायला लावणार नाही.

  4. गडावर गोळ्या,बिस्किटं, चॉकलेट्स, वेफर्स इत्यादी प्लॅस्टिकबंद पदार्थ विकणे (जर विकत असाल तर) ताबडतोब बंद करा. कारण याचाच अतिरेक झाल्याने आज गडाकर ही कारवाई झाली आहे. हे पदार्थ ट्रेकला खाल्ले नाहीत तर कोणीही मरत नाही.

  5. आपापल्या हॉटेल्सच्या बाहेर पॉलिथिन बॅग्स सक्तीने लावून ठेवा आणि पर्यटकांनी (हा शब्द मुद्दाम वापरला आहे) स्वतःबरोबर आणलेलं प्लास्टिक त्यातच टाकायची कडक सूचना करा. तसं त्यांनी न केल्यास त्यांच्या पुढच्या ऑर्डर्स सरळ कॅन्सल करा (सगळ्यांनीच हे केलं तर या लोकांच्या जेवणाखाण्याची बोंब होईल). चार पैसे मिळत आहेत असा हव्यास धरलात तर हॉटेल कायमचं बंद होईल आणि तुम्ही तिथे नाही म्हणल्यावर हे सगळं नियमित करण्यासाठी वनविभागावर मनुष्यबळाचा अतिरीक्त ताण पडेल. तेव्हा वेळीच जागे व्हा. तुम्ही गिर्यारोहक आणि वनविभाग यांच्यातला स्थानिक दुवा आहात हे लक्षात ठेवा.

  6. पॉलिथीन बॅगमध्ये गोळा केलेला सुका कचरा रविवारी गडाखाली आणून त्याची योग्य विल्हेवाट लावा. गडावर प्लास्टिकचा कचरा जाळल्याने पर्यावरणाला नुकसान झाल्यास तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो.

आज गडाची अवस्था भयाण झाली आहे. त्यामुळे वनविभागाला सहकार्य करणं ही गिर्यारोहकांबरोबर स्थानिकांचीही समान जबाबदारी आहे आणि हॉटेलधारक हे सगळं पाळत आहेत का नाही यावर लक्ष ठेवायची जबाबदारी आपलीच आहे. गडावरील हॉटेल बंद झाल्यास रोजगाराचा प्रश्न तर उत्पन्न होणारच आहे पण बेशिस्त पर्यटनावर नजर ठेवायला मात्र तिथे स्थानिक पातळीवर कोणीही नसेल. तेव्हा आपला हरिश्चंद्रगड वाचवायची जबाबदारी आता आपली आहे. सर्वांनी एकत्र येऊन हा गोवर्धन पर्वत उचलूया आणि हरिश्चंद्राच्या देखण्या रुपयाला पुनरुज्जीवीत करूया.

टीप : जे स्थानिक हॉटेलधारक फेसबुकवर नाहीत त्यांच्यापर्यंत हा मेसेज Whatsapp च्या माध्यमातून पोचवण्यात येत आहे.

©ओंकार ओक

काही कमेंटबहाद्दरांना नम्र विनंती : पोस्टचा मतीदार्थ लक्षात घ्यावा. काही उपयुक्त सूचना असल्यास शांतपणे कराव्यात. पण उगाच “हे कसं चुकलं. आम्हीच कसे बरोबर” असली बोटं घालून स्वतःच्या अपमानाची तरतूद करून घेऊ नका म्हणजे झालं.

Advertisements

माय – स.ग. पाचपोळ


[फॉरवर्डस मधून आलेल्या एका ईमेलमध्ये खालील कविता मिळाली. मूळ फॉरवर्डमध्ये नारायण सुर्वे कवी असल्याचा उल्लेख केला गेला होता. पण प्रणव प्रियांका प्रकाशा ह्या तरुण, जाणकार कवींनी सुचवलेल्या दुरुस्तीनुसार स.ग.पाचपोळ हे मूळ कवी आहेत. त्याप्रमाणे बदल करत आहे. दुर्दैवाची गोष्ट अशी की जितेंद्र जोशी ह्यांनी देखिल एका कार्यक्रमात ही कविता सादर करताना मराठी कवीचा उल्लेख “नारायण सुर्वे” असाच केला आहे.]

हंबरून वासराले चाटती जवा गाय
तवा मले तिच्यामंदी दिसती माझी माय

आयाबाया सांगत व्हत्या व्हतो जवा तान्हा
दुस्काळात मायेच्या माजे आटला व्हता पान्हा
पिठामंदी पानी टाकून पाजत जाय
तवा मले पिठामंदी दिसती माझी माय Continue reading

एक प्रेम कथा


एक मुलगा होता, कैंसर असलेला आणि जास्तीतजास्त एकच महीने आयुष्य असलेला.
एक मुलगी त्याला आवडत होती, जी एका Music CD च्या दुकानामध्ये काम करीत होती.
परंतु त्याने त्या मुलीला आपल्या प्रेमाविषयी काहीच सांगितलेले नव्ह्ते…..
नेहमी तो तिच्या दुकानात जात होता आणि एक सीडी विकत घेत होता, का – तर तिच्याशी दोन शब्द बोलता यावे म्हणून ….
महीना उलटला…त्याचे आयुष्य ही संपले. Continue reading

…अन गझल उमलली !मराठी भावानुवाद


*…अन गझल उमलली!*

उर्दूतील प्रसिद्ध शायर जफर गोरखपुरी ह्यांच्या
‘तो समझो गझल हुई’ ह्या गझलचा मराठी भावानुवाद

*मूळ गझल*

मिले किसीसे नजर, तो समझो गझल हुई,
रहे ना अपनी खबर,तो समझो गझल हुई

मिला के नजरों को, वो हया से फिर,
झुका ले कोई नजर,तो समझो गझल हुई

इधर मचल कर उन्हें, पुकारे जुनूं मेरा,
भडक उठे दिल उधर, तो समझो गझल हुई

उदास बिस्तर की सिलवटें, जब तुम्हें चुभें,
न सो सको रातभर, तो समझो गझल हुई

वो बदगुमां हो तो, शेर सुझे ना शायरी,
वो महर-बां हो ‘जफर’, तो समझो गझल हुई
—————————————

मराठी भावानुवाद
*…अन गझल उमलली!*

भेटता हे, नयन अपुले,बघ गझल उमलली!
मजसी मी, विसरलो अन, बघ गझल उमलली!

बघुन क्षणभर तिने, लाजेने मग हळुच,
नजर खाली झुकविली अन, बघ गझल उमलली !

हे उदास शयन नी;सुरुकुत्या खुपती जीवा,
रात्र सारी जागता मी ,बघ गझल उमलली!

झुरता मी हाय! येथ , ‘तिकडेही’ अन बघा,
‘आग रेशम’ चेतली अन, बघ गझल उमलली !

असताना ती रुसुन, कविता ना मज सुचे,
गोड ती हसली ‘जफर’ अन,बघ गझल उमलली !

(ह्या भावानुवादात जर ‘उमलली’ हा शब्दाच्या
ठिकाणी ‘उमजली’ हा शब्द घातला तर
आशयाचा आणखी एक पदर दिसु शकतो असे
मला वाटते.)

*–मानस६*

गालावर खळी, डोळ्यात धुंदी….


गालावरी खळी डोळ्यात धुंदि
ओठावर खुले लाली गुलाबाची
कधी कुठे कसा तुला सांग भेटू
वाट पाहतो एका ईशा-याची
जाऊ नको दूर तू, अशी ये समोर तू
माझा रंग तू घे, तूझा रंग मला दे

कोणताहा मौसम मस्त रंगाचा
तुझ्यासवे माझ्या जिवनी आला
सुने सुने होते किती मन माझे
आज तेच वाटे धूंद मधुशाला
जगण्याची मज आता कळते मजा
नाहि मी कोणाचा आहे तुझा
सांगतो मी खरे खुरे तुझ्यासाठी जीव झुरे मन माझे थरारे
कधी तूझ्या पुढे-पुढे कधी तुझ्या मागे-मागे करतो मी ईशारे
ए जाऊ नको दूर तू
जाऊ नको दूर तू, अशी ये समोर तू
माझा रंग तू घे, तूझा रंग मला दे

तुझ्या पापण्यांच्य़ा सावलीखाली
मला जिंदगीही घेऊनी आली
तुझ्या चाहुलीची धुन आनंदि
अंतरास माझ्या छेडूनी गेली
जगण्याची मज आता येई मजा
तू माझे जिवन तू माझी दिशा
आता तरी माझ्यावरी कर तुझी जादूगीरी हुर-हुर का जिवाला
बोल आता तरी काहि तरी भेट आता कुठे तरी कसला हा अबोला
ए जाऊ नको दूर तू
जाऊ नको दूर तू, अशी ये समोर तू
माझा रंग तू घे, तूझा रंग मला दे………….