कोरड्या डोळयात माझ्या


कोरड्या डोळयात माझ्या गोठले पाणी कसे
चालताना पाय माझे थांबले कसे

काल कोठे काय झाले सांगतो आता मला
मात्र मी आता न वारा टेकतो भिंतीस मी Continue reading

Advertisements

औदुंबर


Ashok Naigaonkar

आसमंतात सर्वत्र सल्फरचा गंध
माथ्यावर
संथपणे आकारणारे काळपट ढग
दुतर्फा
गच्च झोपड्यंच्या खोबणीत
मख्ख डांबरी रस्ता Continue reading

पांडुरंगा


Ashok Naigaonkar

उसवली ओवी फाकला अभंग
ऐशी स्थिती झाली पांडुरंगा ||

अगा येथे झाला तुडुंब अंधार
दिवे गेले तेही दिसेचिना ||

पामरांचे जग रोजची भाकरी
आणिक आयुष्य ढकलती || Continue reading

स्टेटशासकांनी
खोबरेल तेलाचे न्याय्य वाटप व्हावे म्हणून
सेक्टर सेक्टरमध्ये केंद्रे काढली
दर दिवशी प्रत्येकाने आपले डोके पुढे करायचे
आणि टाळूवर तेल चोपडून घ्यायचे
प्रतिभावंताने

आपले डोके असे खोबरेल तेलासाठी वाकवायचे
म्हणून ठाम नकार दिला, Continue reading

कार्पेट एरिया


चिमणीला मग बिल्डर बोले
का ग तुझे डोळे ओले
काय सांगू, दादा तुला
माझा घरटा कोणी नेला

जेव्हा माणसे
एकमेकांना कापतात
तेव्हा
ताजे मटण मिळणे मुष्कील होते
कारण
तेव्हा सारी पशुवधगृहे बंद असतात Continue reading

एकदा पहिल्या पन्नासातच पन्नास हजार विद्यार्थी आलेएकदा पहिल्या पन्नासातच
पन्नास हजार विद्यार्थी आले
मग तपासाणारे म्हणाले
आता १०१ टक्के, १०२ टक्के, १०३ टक्के
असे मार्क देउ या!

नंतर नंतर व्हावचरं बनवणारे,
कॉरस्पॉन्डन्स करणारे लोक
शहरात राहू लागले Continue reading

सुलभ शौचालय


विक्रोळीच्या संपतला मी म्हटले
तु रूळावर काय शी करायला बसतोस?
अरे केवढी मोठी गाडी आणि माणसे जातात या रूळावरून?
तु संस्कृतीवर अशी घाण काय उडवतोस?
अरे सरळ शौलायात जावे सुसंकृतपणे Continue reading