संवाद – संतोष आणी अमॄता, तु जातीयेस तर जा ..


जातीयेस तर जा
पण मी मात्र हालणार नाही या झाडापासुन..
वाळलेलं म्हणत असेन जग त्याला
पण माझ्यासाठी अजुनसुद्धा हिरवगांर आहे ते..
याच्या वाळक्या फांद्यांतुन जेव्हां आभाळ बघतो ना..
तेव्हां वाटत,
तडे झाडाला नाहीत वर ढगाला पडलेत ..
हे तडे बुजवायचे आहेत मला
माझ्या कवितांनी ..
तु जातीयेस तर जा, मी नाही आडवणार ..
पण दुःख होइल ईतकचं
एक तडा खोल माझ्याही काळजात पडेल..
फक्त तो बुजवायला तु नसशील
असो,
नशीब म्हणायचं.. एक झाडाचं आणी दुसरं माझं..

संतोष (कवितेतला)

——————————-
चल लवकर निघुयात, ऊशीर होइल फार
तिकडे जग वाट बघतंय आपली
कविता वगैरे पुरे आता
थोडं सत्यात जगुन बघ..
अरे वाळलेलंच झाड ते.. मरेन आज ना उद्या
त्यासाठी तु का स्वतःला जाळुन घेतोस ?
चल उठ निघुयात .. ऊशीर होईल
अरे, बाहेर जग वाट बघतयं आपली..
बाकी नशीब म्हणायचं, एक तुझं आणी दुसर त्या झाडाचं..

अमॄता__

————————-
तु जातीयेस तर जा !!
मला गारवा जाणवतोय हवेत,
पावसाची चिन्हे असावीत
एक काळा ढग आकार घेतोय वर आभाळात
तडे बुजतीलच आता ..
नुसत झाड नाही ते.. एक संकेतस्थळ आहे
तुझं आणी माझ्या कवितांच..
पण.. तु जातीयेस तर जा
असो,
नशीब म्हणायचं.. एक झाडाचं आणी दुसरं माझं..

संतोष (कवितेतला)

———————
मी निघुन गेले, झाडाला आणी त्याला तिथेच सोडुन..
परतीच्या वाटेत एक वीज तेवढी चमकलेली आठवते..
आणी बरसलेला मंत्रमुग्ध पाऊस..
पण मी परत नाहीच वळाले
काही दिवस तसाच मुसळधार पाउस पडत राहिला
त्यानंतर एकदा मी गेले होते त्या झाडापाशी
आता बहरलंय ते..
पण एक अवजड समाधी आहे जवळ..
कुणाची ते काहीच कळालं नाही..
पहिले तर नव्हती ?
त्या झाडाची फुलं त्याच समाधीवर पडत असतात ..

पण तो कुठेच दिसला नाही ..

अमॄता__

————————–
मी तिथेच होतो,
समाधीतुन एक आर्त आवाज पण दिला होता..
तुला वाटलं फांद्याच हालल्या झाडाच्या..
आणी तु मात्र पुन्हा निघुन गेलीस..
असो,
नशीब म्हणायचं.. एक झाडाचं आणी दुसरं माझं..

संतोष (कवितेतला)

——————-

Advertisements

मी कशी उमलली नाही ??


मी अशीच होते काही,मी मला समजले नाही..
मग स्पर्श जाहला त्याचा
पण मी,
अजुन उमलले नाही..

– अमॄता__
_______________________
मी स्पर्श केला तुला पण
तु कशी उमलली नाही ?
….
अर्थाने सांधियलेला
तुज शब्दच गहिरा कळतो
का भाव जाणवीत नाही ?

– संतोष (कवितेतला)
_______________________
मी स्वप्नात असेल कदाचीत
मी कुस वळवली होती
पण गालांवर ओठांचे
मज लाड कळाले नाही
मी कशी उमलली नाही ??

– अमॄता__
_______________________
मी रक्तिमा तुझ्या गाली
फुललेला टिपून गेलो
मी ओठांनी त्यावरती
कविताच गोंदुनी गेलो
पण निजलेली होती तु..
तु अशी खुलावुन गेली
पण, तरी उमलली नाही ..

– संतोष (कवितेतला)
_______________________
मज जाणवले होते पण..
मज आतुन होती भिती
म्हटले, तु जाशील निघुनी
मी म्हणुन उमलली नाही

– -अमॄता__
_______________________
त्या ओठांवर निजलेला
मी तीळ पाहिला होता
त्याचा जन्मच धन्य असावा
हा विचार सोशीला होता
डोळ्यांनीच त्याला टिपले
तु म्हणुन उमलली नाही

– संतोष (कवितेतला)
_______________________
आता गेली रात
अन अर्थही उरला अर्धा..
मज कळते आहे आता
मी का उमलले नाही ??

– अमॄता__
_______________________
असो..
तरीही ईतुके
मज समाधान मनाशी
तीळ जरी सुटलेला
मी खळी सोडली नाही

– संतोष (कवितेतला)
_______________________


FOR MORE –
http://marathikavitaa.blogspot.com/

प्रेमच ते … फुलणारच


प्रेमच ते फुलणारच
लाज बनुन गाली तुझ्या
गोड-गुलाबी खुलणारच
प्रेमच ते फुलणारच..

पोटात होतील लाख गुदगुल्या
नकळत काही घडणारच
आतल्या आत सलणारच
प्रेमच ते फुलणारच..

तळ्यात – मळ्यात करतांना
स्पर्श तुझा झरताना
आभाळ सुद्धा भरणारच
प्रेमच ते फुलणारच..

संतोष (कवितेतला)

लाख असुदे नको हवे पण
ओठ कोरडे पडणारच
मग ओठांना भिडणारच
प्रेमच ते फुलणारच

अमॄता (कवीतांची)

जगासाठी पाउस म्हणजे.. आणी माझ्यासाठी ?


अमॄता (कवीतांची)

जगासाठी पाउस म्हणजे.. आणी माझ्यासाठी ?

आभाळ भरुन आलं आहे आज
मनातल्या काळ्या मेघांनी..
आता सुरु होतील असंख्य सरी,
अश्रुंचे बाण घेउन, काळीज चिरुन आरपार ..
आणी त्या प्रत्येक घावांतुन उमटत राहतील काही शब्द
अंतास एक कवितेची वाट पहात..
जगासाठी पाऊस म्हणजे
अपार प्रेम, जीवन आणी ओलाचिंब मल्हार
आणी माझ्यासाठी .. ??

अमॄता (कवितांची)

——————————-

06:34 (20 minutes ago)

संतोष (कवितेतला)

आतलं काहीस घेऊन उफाळुन येतील एकेक सरी
तुझ्या आठवणींच “अमॄत” विष बनुन भिनेल आज
मग ढगांचे गाज, गडगडाटांचे निनाद
प्रत्येक वीज जणु नागीण बनुन डोक्यात उतरेल
कदाचित जीवच घ्यायला..
मी कुठेही लपलो तरी भिजणारच
प्रत्येक सर ओलाचिंब करुन टाकणार मला
त्यात माझे अश्रु तुला तरी कसे कळावेत ?
जगासाठी पाऊस म्हणजे
अपार प्रेम, जीवन आणी ओलाचिंब मल्हार
आणी माझ्यासाठी .. ??

संतोष (कवितेतला)

————————————

06:34 (20 minutes ago)

अमॄता (कवीतांची)

बाहेर मन वाळत घातलं आहे मी
आता सुकणारच होत, आणी इतक्यात पाउस कोसळला
सुरुदेखील झाला इतका बेभान होऊन,
बाहेर तरी पडुच कशी ??
मी देखील त्या पावसाचाच एक भाग होईन जाईल
आणी नाही गेले तर माझ मन मात्र पुन्हा वाहुन जाईल
त्या पाऊसधारांतुन ..
त्याचा स्पर्श देखील तसाच असेल थंड शिरशिरी उठवणारा
पहीले तर “संतोष” देणारा ..
नंतर व्यसन बनणारा
जगासाठी पाऊस म्हणजे
अपार प्रेम, जीवन आणी ओलाचिंब मल्हार
आणी माझ्यासाठी .. ??


My Bolgs
http://kalaakaari.blogspot.com/
http://kalaakaari.blog.com/
http://kalaakaari.blog.co.uk/
http://marathikavitaa.blogspot.com/
http://kavitaamarathi.blogspot.com/