पूर्वी


फार नव्हता फरक पूर्वी
यायची पण सणक पूर्वी

शोषले कुठल्या जळूने
रक्त होते भडक पूर्वी Continue reading

Advertisements

तुला भेटलो


प्रथमच आधी प्रसंग ठरवून आणि आधी बांधलेल्या चालीवर लिहायचा प्रयत्न केलाय.
आवडेल अशी आशा आहे. तुमच्या प्रतिक्रिया जरुर कळवा. आणि हो, गाणं आवडलं तर नक्की शेअर करा..

अभिजीत

लळा लावते


गुदमरतो मी, कोणी इतका लळा लावते
अन कोणी गुदमरण्याला सापळा लावते

प्रेमाचाही सूर कुणाचा चुकतो येथे
कुणी विराणी गातानाही गळा लावते Continue reading

विठ्ठला


अभिजीत दाते
अभिजीत दाते
का अजून ही जुनीच वीट विठ्ठला
माग की हिरेजडीत सीट विठ्ठला
हात जोडता इथून पावतोस की
लागतेच दोनदा व्हिजीट विठ्ठला

मी न शेठजी कुणी, व्हिआयपी कुणी
परवडेल का तुझे तिकीट विठ्ठला
भक्तीभाव हीच शक्य देणगी मला
आणखी न कोणती रिसीट विठ्ठला
लागते नवीन नित्य ज्या जगामधे
तू जुना तरी कसा अवीट विठठला
ठेव मग खुशाल हात तू कटीवरी
भक्त होऊ दे अजून धीट विठ्ठला
उगम तुझ्यात वाटतो तुझ्यात अस्तही 
जन्मही तुझीच पायपीट विठ्ठला

– अभीजीत दाते (03-11-2014)

काय फ़रक पडतो


नसेल कोणी तुझ्याबरोबर, काय फ़रक पडतो
कोणी नंतर कुणी अगोदर, काय फ़रक पडतो

तुझ्या रथाचा लगाम त्याच्या हाती आहे ना
उभे ठाकले समोर शंभर, काय फ़रक पडतो Continue reading

आणखी


Abhijit Date

नकोच माझा विषय आणखी
जरा टळू दे प्रलय आणखी

विसर तुझा पडला असता पण
जिवास नव्हती सवय आणखी Continue reading