पावसा पावसा किती येशील ?


पावसा पावसा किती येशील?
आधीच ओलेत्या रातराणीला
किती भिजवशील?

पावसा पावसा थांब ना थोडा
पिळून काढुन न्हालेले केस
बांधु दे एकदा सैल अंबाडा

पावसा पावसा लप ढगात
सागफ़ुलांची कशिदा खडीची
घालु दे तंगशी चोळी अंगात

पावसा पावसा ऊन पडु दे
वाळाया घातला हिरवा शालू
चापूनचोपून तिला नेसू दे

पावसा पावसा पाहा ना जरा
जांभळ्या फ़ुलांचा देवबाभळीने
वेणीत घालाया केला गजरा

पावसा पावसा आडोश्यातुन
साजरा शृंगार रानराणीचा
दुरून न्याहाळ डोळे भरून …

कवी – अनिल

Advertisements

गगनि उगवला सायंतारा


बैस जवळि ये, बघ ही पश्चिम
कोमल रंगी फुलली अनुपम
ये नेत्री ते घेउ साठवुनि
गालावरती गाल ठेवुनी
गगनि उगवला सायंतारा Continue reading

आज अचानक गाठ पडे


भलत्या वेळी भलत्या मेळी
असता मन भलतीचकडे

नयन वळविता सहज कुठेतरि
एकाएकी तूच पुढे Continue reading

अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुले ना


अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुले ना
मिटले तसेच ओठ, की पाकळी हले ना !

समजूत मी करावी, म्हणुनीच तू रुसावे
मी हास सांगताच, रडताहि तू हसावे
ते आज का नसावे, समजावणी पटे ना
धरिला असा अबोला, की बोल बोलवेना ! Continue reading

केळीचे सुकले बाग, असुनिया पाणी


केळीचे सुकले बाग, असुनिया पाणी
कोमेजलि कवळी पाने, असुनि निगराणी

अशि कुठे लागली आग, जळति जसे वारे
कुठे तरी पेटला वणवा, भडके बन सारे Continue reading

कुणि जाल का, सांगाल का, सुचवाल का ह्या कोकिळा ?


कुणि जाल का, सांगाल का, सुचवाल का ह्या कोकिळा ?
रात्री तरी गाऊ नको, खुलवू नको अपुला गळा

आधीच संध्याकाळची बरसात आहे लांबली
परत जाता चिंब चुंबन देत दारी थांबली
फार पूर्वीचा दिला तो श्वास साहुन वाळला
आताच आभाळातला काळोख मी कुरवाळला

सांभाळुनी माझ्या जिवाला मी जरासे घेतले
इतक्यात येता वाजली हलकी निजेची पावले
सांगाल का त्या कोकिळा, की झार होती वाढली
आणि द्याया दाद कोणी रात्र जागुन काढली

गीत – आ. रा. देशपांडे ’अनिल’
संगीत – यशवंत देव
स्वर – पं. वसंतराव देशपांडे