यळकोट यळकोट जय मल्हार


Vishal Naikwadi

माझ्या कानड्या कानड्या मल्हारी
गातो यळकोट मल्हारी कैवारी

तुझ्या कानडं कानडंपणाला
बानू भाळली भाळली कोणाला
यावं भक्ताच्या भक्ताच्या वाड्याला
देवा सोडावी सोडावी जेजुरी Continue reading

Advertisements

छातीत निर्भय श्वास दे


छातीत निर्भय श्वास दे,
साथीस कणखर हात दे।
फुत्कारणार्या संकटांना
ठेचणारे पाय दे ।।
ध्येय दे उत्तुंग मंगल
अढळ कैलासापरी ।
कारुण्य निर्मळ वाहू दे
हृदयातून गंगेपरी ।।
दीनदुबळ्या रक्षणा रे,
शस्त्र दे माझ्या करी ।
दु:शासनाच्या दानवी
रुधिरांत धरती न्हाऊ दे।।
निष्पाप जे ते रुप तुझे
उमजूं दे माझे मला ।
धर्म, जाती, पन्थ याच्या
तोड आता श्रुंखला ।।
नवीन गगने, नवीन दिनकर,
नवीन चंद्राच्या कला,
या नव्या विश्वात तुझ्या
न्याय नीती नांदू दे ।।
छातीत निर्भय श्वास दे…

— अनामिक

मराठी कविता संग्रह

शिवाजी महाराजांच्या युद्धशास्त्रावरील “वेध महामानवाचा” ह्या सुंदर पुस्तकाच्या मलपृष्ठावरची कविता. कवि अज्ञात.

छातीत निर्भय श्वास दे,
साथीस कणखर हात दे।
फुत्कारणार्‍या संकटांना
ठेचणारे पाय दे ।।

ध्येय दे उत्तुंग मंगल
अढळ कैलासापरी ।
कारुण्य निर्मळ वाहू दे
हृदयातून गंगेपरी ।।

View original post 58 more words

… आणि – मला मोठं व्हायचं होतं!


… जेंव्हा “निष्पापपणा” हा स्वाभाविक असायचा…
… जेंव्हा “पिणे” म्हणजे फक्त रसना असंच माहित होतं…
… जेंव्हा “बाबा” हे एकमेव हिरो वाटायचे..
… जेंव्हा “प्रेम” म्हणजे आईची ती मिठी/ झप्पी असंच माहित होतं…
… जेंव्हा “बाबांचे खांदे” म्हणजे जगातील सर्वात उंच गोष्ट वाटायची…
… जेंव्हा “वाईट – शत्रु” म्हणजे आपली खट्याळ भावंडं वाटायची… Continue reading

“प्रेयसी असेपर्यंत सारं ठीक होतं”


प्रेयसी असेपर्यंत सारं ठीक होतं
बायको झाल्यापासून
भांडणे खुप वाढली आहेत,
संसाराच्या वृक्षावरील
हिरवी पाने पार झाडली आहेत,,
उरला आहे तो फ़क्त पालापाचोळा… Continue reading

एकांत आणि मी


आजकाल इथं आम्ही दोघंच असतो..
माझा एकांत आणि मी.
आजकाल तसं दुस-या कुणाशी
फारसं पटत नाही..
तासन तास दोघं बोलत बसतो,
निश्चल अंधाराच्या काठाशी,
कधी मनात जपलेल्या वाटांशी.. Continue reading

असा कोणी असेल का ?


असा कोणी असेल का?
आयुष्याच्या नवीन वळणावर,
माझा हाथ विश्वासाने पकडणारा,
असा कोणी असेल का? Continue reading

हेच ते वय असतं


हेच ते वय असतं,
जिथे कुणाचं भय नसतं.
स्वप्नातली वाट ही मोकळी असते
आणि कल्पनाही असते स्वस्त.

नको असतात उंच शिखर,
छोटंसं टेकाड पुरेसं असतं.
मन भरून गप्पा मारायला,
असेल जर कुणी मस्त. Continue reading