जमल तर


मधल्या एका दिवसात
कामाठीपुरात सकाळी सकाळी जा
जाऊन एक बच्ची आयटम शोध
रातची दमुन झोपली असली तरी उठव तिला
रेट लाव तिचा ‘आपा’कडे
अन निघ तिथुन तिचा हातात हात धरून
मनातली धग मिटल्याच स्वप्न आणि आनंद
कंडोमसोबत पैक करून
गेला होतास तसाच चालत ऐल्फेस्टन रोडला ये
ट्रेनने दादर गाठ
दाखव तिला बाप्पा
दाखव तिला शिवाजी पार्कातल्या गप्पा
निडरपणे स्टेशनपाशी नाश्ता कर सोबत
बघू दे हॉटेलमालकाला तिला, वेळ भेटला तर तुला पण
वॉशबेसीनमध्ये चेहरा धुताना तिचे गालावरचे मुरुम पहा
खड़ीसाखर आणि टीप बघत असेल ती
तिला खड़ीसाखर हवी असेल – थोडी भरव हाताने
टीप देऊ नको, त्याचा गजरा घे – तिला माळ
तिथुन टॅक्सी घे जुहूला
चौपाटीला उतर
दो चम्मचगोळा घे – ग्रीन कलर डालना भैया और जेली भी म्हणत
आता तिच्याकड़े बघू नकोस – समुद्र बघ
तिची गोळ्याची सुर सुर ऐक मनमुराद !
बाजूला भेळ छान मिळते – ती नाही म्हणेल तरी घे – अर्धी अर्धी खा
समोर निघ चालत समुद्राकड़े
तिने अनुभवले नसेल ऊन – अनुभवू दे तिला
शोधू दे दूर तिला क्षितिजात..तिच घर
माघारी ये,
आकाशपाळण्यात बसव अन अनुभवू दे तिला की
झोपुन नाही, उभ्या बसल्या ही आभाळ बघता येते ते !
आताही तिच्याकड़े बघु नकोस
नको बनूस मर्द तिच्या मनातले कुतुहुल बनत तिच्या डोळ्यात बघून !
शांतपणे गरम वाळुत बसून थंड मनाने सूर्यास्त होईपर्यन्त बस सोबत तिला घेऊन…
तिला सवय नसणार शांततेची – ती नाव सांगेल तुला स्वतःचे
तू नुस्ताच हस अन तिच्याकड़े बघत
जमल तर सांग (जमनार नाही माहितीये – डोळ्याने सांग)
“घाबरु नकोस म्हणून”…
तिला बोलावस वाटेल, तेवढ्यात फोन येईल तिच्या ‘आपा’चा
बोलू दे तिला…तू समुद्र बघ
ठेवल्यावर फोन ती पण समुद्र पाहेल..
येणाऱ्या लाटेवर तिने डोळ्यांनी लिहिलेले ‘अभी जाना होगा’ वाचल की निघ
आता डायरेक्ट टॅक्सी घे
अन टॅक्सीत तुझा हल्का खांदा ओला होतोय न – होऊ दे
ती उपकारार्थ तुला चुंबन करु पाहेल – ओढ़ेल
झिड़कार तिला
डोळ्याने डटाव
पाहू दे टॅक्सीड्राइवरला आरश्यातुन …
जिथुन आणले तिथे सोड तिला…
आणि तोपर्यंत मागे वळून पाहू नकोस जोपर्यंत
अंधारात तुला कोणी कॉलर धरून शिवी घालेल
– अरे ए भेंचोद, रुक साले…
आणि तू ती कॉलर सोडवून,
त्याच्या डोळ्यात घालून बोलशील …
“भेंचोद नही हूँ साब
बहनचोद नहीं हूँ !”
तेव्हा मागे वळून पहा….
ती तुला अंधारात पाहत असेल..
तू स्वतःतला प्रकाश कुरवळत निघ..
ती तिच्या अंधारात परत वळेल..
तू तुझा अंधारात चालायला लाग…
अन हो,
भानावर आलास नंतर कधी तरी….
कविता करू नकोस याची !

  • तनवीर सिद्दीकी
Advertisements

आपल्या येण्याची जाणीव आम्हाला प्रतिक्रियांद्वारे करून द्या. आपली प्रतिक्रिया इथे जरूर नोंदवा.

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s