तो लिहायचा तेंव्हा . . .


तो लिहायचा तेंव्हा,
तिचं झिरझिरीत स्केच उमटायचं
कोऱ्या कागदावर …

तो लिहायचा तेंव्हा,
कागदभर नाचून नाचून सांडायची
तिच्या पायच्या पैंजणातली घुंगरं …

तो लिहायचा तेंव्हा,
दाटायचे तिच्या डोळ्यातले
काळे ढग कागदावर …

तो लिहायचा तेंव्हा,
दरवळायचा कागद
तिच्या केसातल्या गजर्याने …

तो लिहायचा तेंव्हा,
कागदभर चुम्बनं उमटायची
तिच्या ओठांच्या लालीची …

आता तो लिहितो,
वाहत राहतो समुद्र,
कागदाच्या शेवटापर्यंत …

– #उनाड

Advertisements

One thought on “तो लिहायचा तेंव्हा . . .

आपल्या येण्याची जाणीव आम्हाला प्रतिक्रियांद्वारे करून द्या. आपली प्रतिक्रिया इथे जरूर नोंदवा.

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s